सातवी मराठी 9 – नात्याबाहेरचं नातं 

मराठी 9 – नात्याबाहेरचं नातं 

वाक्प्रचार समजून घेवूया ……………

(१) आगेकूच करणे – पुढे जाणे.

(२) रंग चढणे –  आनंदाचे अत्युच्च शिखर गाठणे.

(३) आश्चर्याचा धक्का बसणे –  अचानक चकित होणे.

(४) सुन्न होणे – बधिर होणे.

(५) भास होणे – भ्रम होणे.

(६) नजर खिळणे –  एका जागेवर लक्ष लागणे.

(७) नखशिखान्त न्याहाळणे –   आपादमस्तक नीट पाहणे.

(८) भंग करणे – मध्येच खंडित करणे.

(९) कणव निर्माण होणे  –  दया येणे.

(१०) हायसे वाटणे – जिवाला शांती मिळणे, बरे वाटणे.

(११) चेहरा खुलणे – मुखावर आनंद दिसणे.

(१२) चोरट्या नजरेने पाहणे – गुपचूप पाहणे.

(१३) आपुलकी निर्माण होणे – प्रेम वाटणे.

(१४) मनात घिरट्या घालणे – (एखादा विचार) मनात फिरत राहणे.

(१५) मुक्या शब्दांचा मार देणे- न बोलता समज देणे.

(१६) उत्साह द्विगुणित करणे – उत्साह वाढवणे.

(१७) भुरळ घालणे – भूल पडणे, मोह होणे.

(१८) दातखिळी बसणे  –  घाबरून बोलता न येणे.

(१९) मनात घर करणे –  – मनात रुतून बसणे.

(२०) घाबरगुंडी उडणे   घाबरून जाणे.

(२१) काळजात धस्स होणे – घाबरल्यामुळे धक्का बसणे.

(२२) छाप पाडणे  – ठसा उमटवणे, प्रभाव पाडणे.

(२३) शिरकाव करणे   आत घुसणे.

(२४) चाहूल घेणे  अंदाज घेणे.

(२५) बोबडी वळणे – घावरल्यामुळे शब्द न फुटणे.

(१) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.

उत्तर : थंडीने कुडकुडणार्या व कण्हत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी त्याला थेट घरी आणले.

(२) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव ‘डांग्या ‘ ठेवले.

उत्तर : कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते, म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या’ ठेवले.

(३) लेखक डांग्याला ‘पक्क्या हिमतीचा राखण्या’ म्हणतात.

उत्तर : डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती की, अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्याभल्यांची बोबडी वळायची. म्हणून लेखक डांग्याला ‘पक्क्या हिमतीचा राखण्या’ म्हणतात.

थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्घे    १) हळवा. २) सर्वांगाला वेढून टाकणारा. ३) रान, पानाफुलांना आपल्या इशान्यावर नाचवणारा.  ४) नदीच्या झुळझुळणाच्या पाण्याला मंद लहरीवर खेळवणारा.कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असहय झाली हे वर्णन करणारी पाठातील वाक्ये(१) अंगाचं गाठोडं करून पडलेलं.(२) समोरच्या दोन्ही पायांत मान खुपसलेली.(३) हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हांला सुन्न करून गेला.(४) थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जणू कुणौ पाणी शिंपडलंय की काय असा भास झालेला.५) इवल्याशा जिवाला तशी थंडी असह्यच
पुढील बाबतीत डांग्याचे वर्णन करा११) दिसणे : वाढत्या वयावरोबर डांग्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता. डोळ्यांखालचे पिवळसर पट्टे व मागच्या पायाच्या बोटांवर असलेले लालसोनेरी पट्टे सगळयांचे लक्ष आकर्षित करणारे होते.२) शरीरयष्टी :  डांग्याची  शरीरयष्टी  अधिक दगकट त्याचे तरगेबांड शरीर सगळयांच्या नजरेला भुरळ घालणारे होते.३) चाल : डांग्याची दुडुदुडु चाल सर्वांना भावणारी होती.४) नजर : त्याचे तेजस्वी डोळे बोलके होते.
[तुम्ही काय कराल ?](१) एका कुत्र्याच्या पिल्लाच्या पायाला इजा झाली आहे, अशा प्रसंगी तुम्ही काय कराल ?हे नमुना उत्तर : त्याला उचलून घेईन. रुमालात गुंडाळून ऊब देईन. त्याच्या पाठीवरून हात फिरवीन. त्यालाघरी घेऊन जाईन. जखम नीट पाहून त्यावर घरगुती औषधोपचार करीन. ठरावीक वेळाने दूध प्यायला देईन,ते बरे होईपर्यंत सर्वतोपरी पिल्लाची काळजी घेईन.
(२) तुमच्या घराच्या बाहेरील बाजूस चिमणी घरटे बांधत आहे.उत्तर : मी चिमणीचे घरटे तिला बांधू देईन. चिमणी घरटे कसे बांधते, याचे दररोज निरीक्षण करीन. तिलाखायला दाणे व प्यायला पाणी देईन. घरट्यातील चिमणीच्या पिलांची काळजी घेईन. इतर धोक्यांपासून मी चिमणीच्या घरट्याचे रक्षण करीन.

प्रश्न. पुढील शब्दांचे तुम्हांला समजलेले अर्थ लिहा :(१) हुडहुडी – थंडीने अंग थरथर कापणे, कापरे भरणे.
(२) रुखरुख  मनात हळहळ वाटत राहणे.(३) फुलोर – फुलाआधी येणारा परागांचा गुच्छ.(४) अष्टपैलू व्यक्तिमत्त्व   अनेक गोष्टींत कुशल असणारी व्यक्ती.(५) विश्वस्त –  विश्वासू राखणदार, मूळ संस्थापकांपेकी एक व्यक्ती.(६) सोहळा – समारंभ, उत्सव.
प्रश्न   पुढील शब्दांचा सहसंबंध लावा : (रंगछटा आणि नामे)उत्तरे   (१) शुभ्र  – चांदणे(२) प्रसन्न  – सकाळ(३) लालसोनेरी  – पट्टे(४) निळसर-     चांदणे(५) हळदुली –   किरणे

Leave a Reply