सातवी मराठी -३ – तोडणी

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा :

(१) मीराने वसंताला तमसो मा ज्योतिर्गमय ‘याचा काय अर्थ सांगितला .

उत्तर : तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे अंधारातून उजेडाकडे, असा अर्थ मीराने वसंताला सांगितला.या अर्थाचा खुलासा  व्हावा, म्हणून पुढे ती म्हणाली ‘तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही, म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड!”

(२) वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ कशी होती .

उत्तर : वसंताच्या मनात शिक्षणाची खूप प्रचंड ओढ होती. चिमणीच्या उजेडात मीराला – वसंताचे पुस्तक सापडले. तिच्या ओरडण्याने वसंताला लगेच शाळेची आठवण झाली. तो खोपीच्या वाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार ? त्याच्या मनात शिक्षणाविषयी सतत इच्छा  होत होती. यावरून वसंताच्या मनातील प्रश्न शिक्षणाची ओढ दिसून येते.

(३) अगं ! पण दादानंच शिक्षण तोडलं तेंव्हा  वाचायला तरी कसं येणार?’ या वाक्याचा अर्थ.

उत्तर : दादांना म्हणजेच शंकरला म्हणजेच वसंताच्या वडिलांना ऊसतोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता. म्हणून दादांनी वसंताचे  शिक्षण मध्येच  थांबवले. त्यामुळे वसंताला वाचन करायला जमणार नाही  . असा या वाक्याचा अर्थ आहे.

वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोथून लिहा.

उत्तर : वसंतची शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये : (१) मीराचा आरडाओरडा ऐकून वसंताला शाळेची आठवण झाली. (२) ‘दादा, मले साळांत कवा थाडणार?’ (३) त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला (४) सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली,तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला; पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा अर्थ त्याला  नीट समजत नव्हता.(५) ‘ताई, मला सडकेवर कागद गवसला. त्यावर काय लिव्हलंय बग ?’ (६) ‘अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं, तवा वाचायला तरी कसं येणार. ताई, काही झालं तरी मी शिकणारच. ‘ (७) कोपीबाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंतला उभारी आली. (८) वसंतनं लगेच मित्रांना गाठलं, ‘आता म्या साळंलायेणार, असं वसंता सगळ्यांना सांगत सुटला.

(१) बैलांचे खादय-  पाचुंदयातील सरमड

२ )ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शाळा  – साखरशाळा

प्रश्न  १) तुम्हांला कथेतील कोणते पात्र सर्वांत जास्त आवडते ? सकारण सांगा.

उत्तर : कथेतील वसंताची ताई-मीरा, हे पात्र मला सर्वांत जास्त आवडले. मीराचे शिक्षण आठवीपर्यंतच झाले होते; परंतु ती हुशार होती. संस्कृतच्या वचनाचा तिने बरोबर अर्थ सांगितला मीरा आईवडिलांना ऊसतोडणीच्या कामात मनोभावे मदत करीत होतीच, परंतु विशेष म्हणजे वसंताने पुढे शिकावे, अशी प्रेरणा तिने वसंताला दिली.यामुळे मीरा हे पात्र मला सर्वांत जास्त आवडले.

(२) साखरशाळेत जाणाऱ्या राजेशला तुम्ही अभ्यासाबाबत कोणती मदत कराल ?

नमुना उत्तर : राजेशला मी शाळेमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करीन. त्याला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगेन. त्याला वहया-पुस्तके घेऊन देईन. नवा गणवेश देईन. शक्य झाल्यास त्याला दररोज शाळेत पोहोचवीन. त्याचा नियमित अभ्यास घेईन. अशा प्रकारे राजेशला मी शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देईन.

१) साखरशाळा कोणत्या मुलांसाठी असते ?

उत्तर : ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळा असते.

(२) ही शाळा कोठे भरते ?

उत्तर : ऊसतोडणी ज्या भागात होते, त्या परिसरात (साखर कारखान्याजवळ) साखरशाळा भरते.

(३) साखरशाळा कशासाठी सुरू झाल्या आहेत ?

उत्तर : ऊसतोडणीचे कामगार फिरतीवर असतात. त्यांची मुले शिक्षणापासून दूर  राहू नयेत ; म्हणून साखरशाळा सुरू झाल्या आहेत.

Leave a Reply