सातवी भूगोल,3. भरती ओहोटी

सातवी भूगोल, 3 भरती ओहोटी
प्रश्न १. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा :

उत्तर

(৭) लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण  वारा  आहे.

(२) भरतीच्या पाण्याचा  मासेमारी व्यवसायास फायदा होतो.

(३) लाटेच्या उंच भागाला शीर्ष  म्हणतात. 

प्रश्न २. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :

(৭) लाटांची गती कशावर अवलंबून असते?

उत्तर : लाटांची गती वार्याच्या  वेगावर अबलंबून असते.

(२) भरती-ओहोटीचे दोन मुख्य प्रकार कोणते ?

उत्तर : उधाणाची भरती-ओहोटी आणि भांगाची भरती-ओहोटी हे भरती-ओहोटीचे दोन मुख्य प्रकार आहेत.

(३) उधाणाची भरती-ओहोटी केव्हा येते ?

उत्तर : उधाणाची भरती-ओहोटी प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला व पौर्णिमेला येते.

(४) भांगाची भरती-ओहोटी केव्हा येते ?

उत्तर : भांगाची भरती-ओहोटी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अष्टमीला येते.

(५) पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात. ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात ?

उत्तर : पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात. ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण  बलाच्या विरोधात कार्य करतात.

प्रश्न ३. पुढील संज्ञा स्पष्ट करा :

(१) शीर्ष : सागरी लाटेचा उंच भाग, म्हणजे ‘शीर्ष होय.

(२) द्रोणी : सागरी लाटेचा खोलगट भाग, म्हणजे ‘द्रोणी’ होय.

(३) त्सुनामी : सागरतळाशी होणाच्या भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्देकामुळे निर्माण होणान्या प्रचंड उंचीच्या अत्यंत विध्वंसक लाटा, म्हणजे ‘त्सुनामी’ होत.

प्रश्न ४. पुढील बाबींचा भरती-ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा :

(१) पोहणे (२) जहाज चालवणे (३) मासेमारी (४) मीठ निर्मिती (५) सागरी किनारी सहलीला जाणे.

उत्तरे : 

(१) पोहणे भरती-ओहोटीच्या वेळा माहीत करून घेऊन पोहण्यास जाणे योग्य ठरते. भरतीच्या त्याचप्रमाणे ओहोटीच्या काळातही समुद्रात खूप आत जाऊन पोहणे धोकादायक ठरते. सर्वसाधारणपणे भरतीच्या वेळी समुद्रकिनाच्याजवळच्या भागात पोहणे योग्य ठरते.

(२) जहाज चालवणे : भरतीच्या वेळी जहाज समुद्रकिनान्यावरून (बंदरातून) सागरजलात नेणे व सागरजलातून समुद्रकिनाच्यावर (बंदरात) आणणे अधिक सोपे असते. त्यामुळे भरतीच्या वेळेचा अभ्यास करून जहाज चालवले जाते.

(३) मासेमारी : भरतीच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मासे समुद्रकिनारी भागात व खाडीच्या भागात येतात. त्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते.

(४) मीठ निर्मिती : भरतीच्या वेळी खूप मोठया प्रमाणावर समुद्राचे पाणी किनान्याजवळच्या भागात येते.त्यामुळे भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिठागरांमध्ये साठवून त्यापासून मीठ बनवणे फायदेशीर ठरते.

(५) सागरी किनारी सहलीला जाणे : भरती-ओहोटीच्या वेळा माहीत करून घेऊन सागरी किनारी सहलीला जाणे योग्य ठरते. भरतीच्या वेळी सागरी क्रीडाप्रकारांचा योग्य खयरदारी घेऊन आस्वाद घेणे शक्य होते.

प्रश्न ५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

(৭) जर सकाळी सात वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा.

उत्तर : (१) जर सकाळी सात वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढ्ील ओहोटीची वेळ ही साधारणपणे दुपारी १ वाजून १२ मिनिटे व त्यापुढील भरतीची वेळ ही साधारणपणे संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटे अशी असेल.

(२) ज्या वेळी मुंबई (७३’ पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण सांगा.

उत्तर : ज्या वेळी मुंबई (७३ पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्यावेळी १०७” पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल.

कारणे : (१) पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किया ओहोटी येते, त्याच्या विरुद्ध ठिकाणीही (प्रतिपादी स्थानावर) त्याच देळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. (२) ७३” पूर्व रेखावृत्ताच्या विर्द्ध बाजूस (प्रतिपादी स्थानावर) १०७ पश्चिम रेखावृत्त आहे.

(३) लाटानिर्मितीची कारणे स्पष्ट करा.

उत्तर : (१) लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण यारा आहे. (२) काही वेळा सागरतळाशी भूकंप झाल्यास किंया ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यासही लाटा निर्माण होतात.

(४) लाटा निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.

उत्तर : (१) वार्याकडून मिळणाऱ्या शक्तीने (ऊर्जेने) सागरातील पाणी गतिमान (प्रवाही) होते. (२) वाऱ्यांमुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात. अशा प्रकारे लाटा निर्माण होतात.

(५) लाटेची उंची व लांबी कशा प्रकारे सांगता येते ?

उत्तर : (१) शीर्ष व द्रोणी या लाटेच्या दोन भागांदवारे लाटेची उंची आणि लांबी सांगता येते. (२) शीर्ष आणि द्रोणी यांमधील उभ्या अंतरादवारे लाटेची उंची सांगता येते. (३) दोन शीर्षादरम्यानच्या किंवा दोन द्रोणींदरम्यानच्या अंतराद्वारे लाटेची लांबी सांगता येते.

(६) लाटांचे परिणाम स्पष्ट करा.

उत्तर : (१) लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या किनारी भागाची झीज होते. (२) उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते. (३) त्सुनामीसारख्या विध्वंसक लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते.

प्रश्न ६. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :

(१) भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.

उत्तर : (१) सूर्यापिक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. (२) त्यामुळे भरती-ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरीत्या कार्य करते. म्हणून भरती-ओहोटीवर सूर्यपिक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.

(२) काही ठिकाणी किनार्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.

उत्तर : (१) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते. (२) त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते. (३) अशा भागात तिवराची वने झपाट्याने वाढतात. (४) अशा भागात किनारी भागांतील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते. त्यामुळे काही ठिकाणी किनान्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.

(३) ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.

उत्तर : (१) जेव्हा एखादया रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते, तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा केंद्रोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो. त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले जाते व तेथे भरती येते. (२) भरतीमुळे या रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या समोरासमोरील दोन रेखावृत्तांवरील पाणी ओसरते व त्याच वेळी तेथे ओहोटी येते. अशा प्रकारे ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील (प्रतिपादी स्थानावर) ओहोटीच येते.

(४) सागरी लाटा उथळ किनारी भागात येऊन फुटतात.

उत्तर : (१) वार्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांमुळे सागराचे पाणी वर-खाली व किंचित मागे-पुढे होते. (२) सागरी लाटा त्यांच्यात सामावलेली ऊर्जा किनार्यापर्यंत घेऊन येतात. त्यामुळेच लाटा उथळ किनारी भागात येऊन फुटतात

प्रश्न ७, फरक स्पष्ट करा :

(৭) भरती व ओहोटी.

उत्तर :

भरती

৭. सागरजलाच्या पातळीत होणारी वाढ, म्हणजे ‘भरती’ 

२. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते.

ओहोटी

१. सागरजलाच्या पातळीत होणारी घट, म्हणजे ‘ओहोटी’ होय.

२. ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते.

(२) उधाणाची भरती व भांगाची भरती,

उत्तर :

उधाणाची भरती

१. पौर्णिमेला व अमावास्येला येणारी भरती, म्हणजे ‘उधाणाची भरती होय

२. उधाणाच्या भरतीतील सागरजलाची पातळी ही इतर भरतीतील सागरजलाच्या पातळीच्या तुलनेत सर्वांत अधिक असते

भांगाची भरती

१ शुक्ल व कुष्ण पक्षातील अष्टमीला येणारी भरती,म्हणजे ‘भांगाची भरती होय.

२. भांगाच्या भरतीतील सागरजलाची पातळी ही इतर भरतींतील सागरजलाच्या पातळीच्या तुलनेत सर्वात कमी असते.

(३) उधाणाची ओहोटी व भांगाची ओहोटी.

उत्तर :

उधाणाची ओहोटी

१पोर्णिमेला व अमावास्येला येणारी ओहोटी, म्हणजे उधाणाची ओहोटी होय.

२. उधाणाच्या ओहोटीतील सागरजलाची पातळी ही इतर ओहोटीतील सागरजलाच्या पातळीच्या तुलनेत सर्वांत कमी असते.

भांगाची ओहोटी

१. शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येणारी ओहोटी, म्हणजे भांगाची ओहोटी’ होय,

२. भांगाच्या ओहोटीतील सागरजलाची पातळी ही इतर ओहोटीतील सागरजलाच्या पातळीच्या तुलनेत सर्वात अधिक असते.

लाट व त्सुनामी लाट.

उत्तर :

लाट

৭. वार्याकडून मिळणाच्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाट निर्माण होते.

२. लाट विनाशकारी नसते.

त्सुनामी लाट

१. सागरतळाशी झालेल्या भूकंप व ज्वालामुखीमुळे त्सुनामी लाट निर्माण होते.

२. त्सुनामी लाट विनाशकारी असते.

प्रश्न ८. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :

(१) भरती-ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते, ते लिहा.

उत्तर : भरती-ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम पुढीलप्रमाणे आहेत :

(अ) चांगले परिणाम : (१) भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. (२) भरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचर्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो. (३) भरती-ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत. (४) भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. ( ५) भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. (६) भरती-ओहोटीच्या प्रक्रियेमुळे वीज निर्माण करता येते. (७) भरती- ओहोटीमुळे तिवराची वने व किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते.

(ब) वाईट परिणाम : भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो  

. त्सुनामी लाट माहिती लिहा.

उत्तर : (१) काही वेळा सागरतळाशी भूकंप झाल्यास व ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यास, अत्यंत विध्वंसक स्वरूपाच्या लाटा निर्माण होतात. अशा लाटांना त्सुनामी म्हणतात. (२) उथळ किनारी भागांत त्सुनामी लाटांची उंची प्रचंड असते (३) त्सुनामी लाटांमुळे मोठया प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते. (४) २००४ साली सुमात्रा व इंडोनेशिया बेटांजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड ल्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यांचा तडाखा भारताचा पूर्व किनारा व श्रीलंका या देशांनाही बसला होता (५) त्युनामीचा धोका निर्माण झाला असता किनारी भागापासून दूरजाणे किंवा समुद्रसपाटीपासून उंचावर जाणे उपयुक्त ठरते. त्यामुळे जीवितहानी टाळता येते.

(३) उधाणाची भरती-ओहोटी  स्पष्ट करा.

उत्तर : (१) चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावास्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते. (२) त्यामुळे पौर्णिमेला व अमावास्येला सरासरी भरतीपेक्षा मोठी भरती व सरासरी ओहोटीपेक्षा मोठी ओहोटी येते. (३) या भरती-ओहोटीला उधाणाची भरती-ओहोटी म्हणतात. (४) उधाणाच्या भरतीच्या ठिकाणी पाण्याचा नेहमीपेक्षा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी नेहमीपेक्षा अधिक खोलपर्यंत ओसरते.

(४) भांगाची भरती-ओहोटी  स्पष्ट करा.

उत्तर : (१) चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून दोन वेळा पृथ्वी आणि सूर्य यांच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. (२) ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. (३) या दोन दिवशी भरती निर्माण करणार्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. त्यामुळे या दोन दिवशी चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसर्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. (४) त्यामुळे ज्या ठिकाणी चंद्रामुळे भरती निर्माण होते; त्याच ठिकाणी सूर्यामुळे ओहोटी निर्माण होते व ज्या ठिकाणी चंद्रामुळे ओहोटी निर्माण होते; त्याच ठिकाणी सूर्यामुळे भरती निर्माण होते. (५) अशा तन्हेने निर्माण झालेल्या भरतीमुळे पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व ओहोटीमुळे पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी उतरते. (६) या भरती-ओहोटीला भांगाची भरती-ओहोटी म्हणतात. (७) भांगाची भरती-ओहोटी सरासरीपेक्षा अधिक लहान असते. (

(५) भरती-ओहोटीच्या वेळेत रोजच्या रोज होत जाणारा बदल  स्पष्ट करा.

उत्तर : (१) पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणची भरती- ओहोटीची वेळ दररोज बदलते. (२) एकाच दिवसातील दोन भरतींच्या किंवा दोन ओहोटयांच्या वेळांतील फरक हा सुमारे १२ तास २५ मिनिटांचा असतो. (३) कोणत्याही पुढील दिवसातील दोन भरतींच्या किंवा दोन ओहोटयांच्या वेळा या त्या दिवसाच्या अगोदरच्या दिवसातील दोन भरतींच्या किंवा दोन ओहोटयांच्या वेळांपेक्षा प्रत्येकी सुमारे ५० मिनिटे पुढच्या असतात 

प्रश्न ९. जोड्या लावून साखळी बनवा :

उत्तरे : 

(१) लाटा-वारा-भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेही होतात.

(२) केंद्रोत्सारी प्रेरणा-पृथ्वीचे परिवलन-वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते.

(३) गुरुत्वीय बल-चंद्र, सूर्य व पृथ्वी-पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते.

(४) उधाणाची भरती-अमावास्या-सर्वांत मोठी भरती त्या दिवशी असते.

(५) भांगाची भरती-अष्टमी-चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशांनी कार्य करतात.

Leave a Reply