बलिकादिन विशेष

सावित्रीबाई फुले

(३ जाने. १८३१, मृत्यू १० मार्च १८९७) :

महाराष्ट्रातील महान समाजसुधारक व बहुजनांचे उध्दारकरे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणाच्या कार्यात त्यांच्या खाद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण व समाजोध्दाराचे कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले या सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या हिच्याशी त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या पूर्ण निरक्षर होत्या. पण लग्न झाल्यावर त्यानी ज्योतिबांकडून आवश्यक ते शिक्षण घेतले सन १८४८ साली ज्योतिबानी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलींना शिकवायचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना. तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या. बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्याना शिकविणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीबाड शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ ब्राह्मण लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल वगैरे फेकीत. पण सावित्रीबाईनी या सर्व छळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले.

ज्योतिबांचे जुन्या विचाराचे वडील कर्मठ लोकांनी त्यांचे कान फुकल्यामळे बिथरले आणि त्यांनी ज्योतिबांना घराबाहेर घालवून दिले. त्या प्रसंगीही पतीच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या व त्यांच्याबरोबर त्याही घराबाहेरा पडल्या. पुढे त्या काळी ‘अस्पृश्य’ मानण्यात येणाऱ्या जातीतील मुलांसाठीही ज्योतिबांनी शाळा काढली, आणि त्यांनाही शिकवण्याची जबाबदारी सावित्रीबाईनी जीव ओतून पार पाडली. पुढे फसलेल्या विधवांना आत्महत्येपासून किंवा अपत्यहत्येपासून वाचविण्यासाठी ज्योतिबांनी आपल्या घरात बालहत्या प्रतिबंधगृह’ काढले. तेव्हा अशा तीस-पस्तीस स्त्रियांना आईची माया देऊन त्यांची बाळंतपणे सुध्दा त्या माऊलीने केली. साबित्रीबाईचे मन कधीही विचलित झाले नाही.

भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले . पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून अंधपणे करीत नव्हत्या, तर त्या कार्यावर त्यांची अढळ निष्ठा होती. म्हणून पतिनिधनानंतरही त्यानी सत्यशोधक समाजाचे. ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले. त्या कविताही करीत १८५४ साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईची भाषणे व गाणी’ नावाचे पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिध्द करण्यात आले.

१८९२ मध्ये ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ व ज्योतिबांची भाषणे या पुस्तकांचेही त्यांनी संपादन केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाईना शतकोटी प्रणाम.

सुविचार •
स्त्री पुरुषांमध्ये निवड नसावी । गुणे आदरायी सर्वकाळ ” माता ही प्रथम श्री आहे. आणि एक श्री म्हणून तिचा | स्वतःचा व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे.
मुलांच्या शिक्षणापेक्षा मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या कारण एक मुलगी शिकली तर तिच्याद्वारा एक कुटुंब सुशिक्षित होते. कमी वेळात व कमी खर्चात राष्ट्र शिक्षित करण्याचा हा खात्रीलायक इपाय आहे – नेपोलियन बोनापार्ट
● स्त्रियांमध्ये स्वत्वजाणीव, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास जागविण्यासाठी शिक्षण हाच पर्याय आहे. देशाची प्रगती कुटुंबाचे स्वास्थ्य व आर्थिक दर्जा, वैयक्तिक विकास हे सार करायच असेल तर स्त्रियांना शिक्षण मिळायलाच हवं, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचं बळ तिला शिक्षणामुळेच मिळणार आहे
• स्त्रिया-पुरुषांइतक्या हुशार व कर्तबगार असतात. म्हणूनच कर्तृत्ववान शुर धाडसी स्त्रिया इतिहासात होऊन गेलेल्या दिसतात .

दिनविशेष – बालिकादिन :
सावित्रीबाई फुले जन्मदिन १८३१ शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी घराचा उबाठा ओलांडणारी महाराष्ट्रातील पहिली स्त्री सावित्रीबाई फुल त्याचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला त्याचा विवाह जोतीराव फुल्याशी झाला. फुल्यांना शिक्षणाची आवड होती. विवाहानंतर जोतीरावांनी त्यांना शिकविले प्रारंभीचे धडे त्यांनी आपल्या मळ्यात धूळपाटीवर गिरविले त्यांनी काही कविताही केल्या होत्या १८४८ साली पुण्यात जोतीरावांनी दलितांसाठीही शाळा काढल्या त्या चालविण्यात | सावित्रीबाईंचा मोठा वाटा होता त्यांच्या या कार्यामुळे त्यांना जननिंदा सोसावी लागली त्याकडे दुर्लक्ष करून अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठीही त्या प्रयत्नशील होत्या त्यांच्या घरी जातिभेद पाळीत नसत अनौरस व टाकून दिलेल्या अनाथ मुलांना सांभाळण्यात जोतीबा फुल्यांना त्यांची मोलाची मदत झाली. १८७६-७७ साली महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळात जोतीरावांच्या बरोबरीने त्यांनी काम केले होते १८९७ साली पुण्यात | प्लेगची साथ होती त्यात लोकसेवा करता करताच त्यांनाही प्लेगची लागण झाली १० मार्च १८९७ रोजी त्यांचा देहान्त झाला ३ जानेवारी १९९५ पासून सावित्रीबाई फुल्याचा जन्मदिन बालिकादिन म्हणून साजरा केला जातो मनात ध्येयाची ऊर्मी असेल तर पायात घावण्याची गती येते. हा दिवस | स्त्रीमुक्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो

→ मूल्ये समता, श्रमनिष्ठा, भूतदया

अन्य घटना • म. गांधीजींनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी गोलमेज परिषदेत केली १९३१
• पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळचे
उद्घाटन १९५०• भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या १९५२
• सर एडमंड हिलरी है दक्षिण ध्रुवावर पोहोचले १९५८
• मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्थेचे प्रमुख संस्थापक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन १९९४
• बालिका दिन व अॅक्युप्रेशर थेरपी दिन

→ उपक्रम
• स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईनी केलेल्या संघर्षावर कथाकथन करा
• सावित्रीबाई फुल्यांना मुलींची शाळा चालविताना आलेले अनुभव सांगा

Leave a Reply