वाचनालयातील एक तास

वाचनालयातील एक तास आमच्या शाळेत एका विख्यात साहित्यिकाला ‘विद्याथ्र्यांशी बातचीत करण्यासाठी बोलाविले होते, त्यांनी विद्यार्थ्याविषयी एक तक्रार केली. आजचा विद्यार्थी वाचनालयापासून दूर होऊ पाहत आहे. अवांतर वाचनाची गोडी त्याला राहिली नाही, त्यांनी केलेली ही तक्रार खरी होती. मला त्यांच्या या तक्रारीमुळेच वाचनालयात जाण्याची प्रेरणा मिळाली. आमच घराजवळच एक वाहर वाचनालय’ आहे. जाता येताना मी फक्त ती पाटी वाचायचो. आज ती पाटी आणि ते वाचनालय मला खुणावू लागले. मी वाचनालयात आज पहिल्यांदा येत होतो. समोरच्याच व्हरांड्यात टेबलवर अनेक वर्तमानपत्रे अगदी शिस्तीत ठेवली होती. लोकमत, तरुण भारत, रोजगार वार्ता, नवभारत, हितवाद, इंडियन एक्स्प्रेस अनेक वर्तमानपत्रे मी एकाच वेळी एवढी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे पाहत होतो. काय वाचू की काय नको असं मला होऊन गेलं. मी नियतकालिकावरची रंगीबेरंगी चित्रे न्याहाळली.
पुढे एक भव्य दिवाणखाना होता. मोठमोठी पुस्तके अक्षरविल्हेनुसार ठेवली होती. ही रचना मला अगदी नवीन होती. मी आपल्याच तालात अख्खा दिवाणखाना धुंडाळत होतो, तेवढ्यात तिथे मध्यभागी बसलेले ग्रंथपाल मला म्हणाले, “अरे बाळ काय हवय तुला, गोष्टीची पुस्तकं सगळी त्या पलीकडच्या कपाटात ठेवली आहेत; पण जरा सांभाळून हाताळायचे हं.” रीतसर परवानगी मिळाल्यामुळे मी हावरटासारखी त्या कपाटाकडे धाव घेतली, पण तिथेही मला पुस्तकांची निवड करता आली नाही. संभ्रमावस्थेत मी सापडलो होतो; कारण वाचनालयात येण्याचा सराव नव्हता, पण त्या क्षणाला मला वाचनालयाचे महत्त्व कळले. मी ठरवले, आज वाचनालयाचा ‘श्रीगणेशा’ झाला होता. आता मात्र रोज वाचनालयात यायचे हा निर्धार मनात केला होता. एक तास कसा संपला हे कळलेसुद्धा नाही. मी परतू लागलो तेव्हा पुन्हा वर्तमानपत्र चाळले. एका वर्तमानपत्रात ठळक अक्षरात लिहिले होते. ‘आजचा विद्यार्थी वाचनालयाच्या बाबतीत उदासीन का? हा प्रश्न माझ्या अंत करणाला चांगलाच बोचला; पण तो बोचरेपणा कमी करण्यासाठी वाचनालयाची सवय लावणे हा एकमेव उपाय आहे व तो उपाय अमलात आणायचा ही खूणगाठ मी मनाशी बांधली व वाचनालयातून निघालो

Leave a Reply