तिसरी मराठी, ७.मुग्धा लिहू लागली

एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता ?
उत्तर – मुग्धाच्या शाळेत बक्षिस समारंभ होता.

(आ) समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते ?
उत्तर- समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक आले होते.

(इ) बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते ?
उत्तर – बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात डायरी (रोजनिशी) दिली होती.
(ई) मुग्धाला आपली चूक का कळू लागली ?
उत्तर – मनाविरूद्ध झालेली गोष्ट ती कागदावर लिहू लागल्याने मुग्धाला आपली चूक कळली.

कोण, कोणास म्हणाले ?
(अ) “चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय, पण ती जास्त बोलत नाही.”
उत्तर- मुग्धाच्या बाई तिच्या आईला म्हणाल्या.

(आ) “मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता. ”
उत्तर लेखक आपल्या भाषणात मुलांना सांगत होते.

(इ) “आणि मी एक साहित्यिक झालो.’
उत्तर – लेखक आपल्या भाषणात मुलांना सांगत होते.

(ई) “हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय.’
उत्तर लेखकाचे काका लेखकाला म्हणाले.

कंसातील दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्ये लिहा. (संकल्प, अबोल, परिवर्तन, मुग्ध, मनाशी, गमतीजमती)

(अ) पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमतीजमती सांगितल्या.

(आ) बोलण्यानं, लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात परिवर्तन‘ घडत गेलं

(इ) त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली

(ई) मुग्धाने मनाशी पक्के ठरवले, नवीन वर्षाचा संकल्प केला.

(उ) मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली.

(१) बाईंनी आईजवळ मुग्धाबद्दल कोणती तक्रार केली ?
उत्तर- मुग्धा अबोल आहे. ही तक्रार बाईंनी मुग्धाच्या आईजवळ केली.

(२) पाहुण्यांची ओळख कोणी करवून दिली ?
उत्तर पाहुण्यांची ओळख जाधव बाईंनी करवून दिली.

(३) प्रमुख पाहुण्यांनी कोणाचे अभिनंदन केले ?
उत्तर प्रमुख पाहुण्यांनी बक्षीस मिळविणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले.

(४) लेखक कविता व कथा कशाच्या आधारावर लिहू लागले
उत्तर- लेखक कविता व कथा घडलेल्या प्रसंगावरून लिहू लागले.

(५) लेखकाचे लेखन कुठे प्रसिद्ध होऊ लागले ? ?
उत्तर- लेखक मोठा झाल्यावर त्याचे लेखन दैनिकात, मासिकात प्रसिद्ध होऊ लागले.

(६) लेखकाला विषय केव्हा सूचत असे ?
उत्तर सर्वांशी गप्पा मारल्याने लिखाणासाठी लेखकाला विषय सूचत असे.

(७) मुग्धाने कोणता निश्चय केला ? उत्तर- मुग्धाने आपणही रोज लिहायचे असा निश्चय केला.

Leave a Reply