तिसरी मराठी, ५. एकदा गंमत झाली

प्रश्न १ थोडक्यात उत्तरे लिहा…
(१) तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता ?
उत्तर आम्हाला आनंद झाला की आम्ही टाळ्या वाजवतो.

(२) नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते ?
उत्तर- जेव्हा छोटे छोटे ओहोळ, ओढे, प्रवाह नदीला येऊन मिळतात तेव्हा नदीचे पाणी वाढते.

(१) मनुली कुठे बसली होती ?
उत्तर-खिडकीत

(२) वाऱ्यामुळे मनुलीच्या गालावर काय फिरवल्यासारखे वाटले ?
उत्तर-मोरपीस

(३) झाड टाळ्या कसे वाजवत होते ?
उत्तर-आपल्या असंख्य पानांनी

(४) झाडाकडे बघत असताना मनुलीला काय दिसले ?
उत्तर-पतंग

(५) खिडकीतून काय आत आले ?
उत्तर-दोन पिंपळाची पाने

(६) मनुलीने पाने कुठे ठेवली ?
उत्तर-पुस्तकात

(७) बाईंनी मुलांना काय काढायला सांगितले ?
उत्तर-सुंदर नदीचे चित्र

(८) मनुलीमध्ये कोणता गुण वेगळा होता ?
उत्तर-कल्पकता

रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.
( १) वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली.
(२) आपण दोन हातांनी टाळया वाजवतो.
(३) पानांकडे एकटक पाहू लागली.
(४) बाई नंतर नदीची कविता शिकवू लागल्या.
(५) छोटेछोट प्रवाह तिला येऊन मिळतात.
(६) बाईसह सगळा वर्ग मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता.

प्रश्न २ असे कोण, कोणास म्हणाले ? (१) “मी गमतीशीर चित्र काढलंय”
उत्तर- मनुली बाईंना म्हणाली.

(२) “अगं, चित्र दाखवतेस ना?”
उत्तर- बाई मनुलीला म्हणाल्या.

(३) “हे तर पान आहे.
उत्तर- बाई मनुलीला म्हणाल्या.

(४) “पाहा बाई, ही डोंगरातून आलेली नदी”
उत्तर मनुली बाईंना म्हणाली.

प्रश्न ३- खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा.
(१) मनुलीने डोळ्याची उघडझाप केली.
उत्तर – बरोबर
(२) झाडे फाद्यांनी टाळ्या वाजवतात.
उत्तर – चूक
(३) खिडकीतून दोन गुलाबाची पाने आत आली.
उत्तर – चूक
(४) मनुली छान कल्पना करते.
उत्तर – बरोबर

प्रश्न ४ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) मनुली कशाने सुखावली ? होऊन पाहत होता.
उत्तर – मनुली गारगार वाऱ्याच्या सुळकेने सुखावली.

(२) झाडाची पानं वाऱ्याने हलली तेव्हा मनुलीला काय वाटले?
उत्तर – झाडाची पानं वाऱ्याने हलली तेव्हा झाडांना खूप आनंद झाला असे मनुलील वाटले.

(३) बाईंनी वर्गात कुणाची माहिती दिली ?
उत्तर- बाईनी वर्गात नदीची माहिती दिली.

(४) मनुलीला कुठली नदी आठवली ? उत्तर – मनुलीला गावाची नदी आठवली.

(५) मनुलीने कोणत्या हातात पान घेतले?
उत्तर – मनुलीने डाव्या हातात पान घेतले.

(६) मनुलीने नदीचे चित्र कसे दाखवले ? उत्तर – मनुलीने नदीचे चित्र खूप सोप्या शब्दात दाखवले.

Leave a Reply