तिसरी मराठी, ४ पाणी किती खोल

(१) म्हशीने रेडकूला काय कापून आणावयास सांगते ?
उत्तर (१) कडब्याची पेंढी

(२) रेडक्याला कशाचा आवाज आला ?
उत्तर-पाण्याचा

(३) नदीकाठी रेडकूला कोण दिसले ?
उत्तर-बैलकाका

(४) पाण्यात कोण वाहून गेले होते ?
उत्तर-खारूताईची मैत्रीण

(५) सकाळी नदी पार करून कोण आले ?
उत्तर-गाढवदादा

(६) खारूताई कशी आहे ?
उत्तर-बुटकी आणि छोटी

(७) रेडकू नदीकाठी कसा जातो ?
उत्तर-उड्या मारत

प्रश्न १ रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.
(१) मी खरंच म्हातारी झालेय.
(२) अरे बाळा माझं एक काम करशील ?
(३) मला नीट कडबा चघळता येईल.
(४) आत्ता’कापून घेऊन येतो.
(५) असा वेडेपणा करू नको.
(६) कुट्टी बंद होती का?
(७) मग तुला घाबरायचं काय कारण ?

प्रश्न २ खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा.
(१) म्हैस वरण, भात, भाजी पोळी खायची.
उत्तर – चूक

(२) रेडकू आजीचे काम ऐकत होता.
उत्तर – बरोबर

(३) खारूताईने रेडकूला मदत केली.
उत्तर – चूक

(४) संकाळीच खारूताई नदीतून आली होती.
उत्तर – चूक

(५) रेडकूला आजीने छान समजाविले. उत्तर – बरोबर

प्रश्न ३- कोण ते लिहा.
(१) कडबा चावता न येणारी
उत्तर – म्हैस आजी

(२) नदीजवळ चरणारे
उत्तर -बैलकाका

(३) नदीचे पाणी पाहून घाबरणारे
उत्तर -रेडकू

(४) सकाळीच पाण्यातून येणारे
उत्तर-गाढवदादा

(५) रेडकूला घाबरविणारी
उत्तर -खारूताई

प्रश्न ४ एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) म्हैस कशी झाली होती ?
उत्तर- म्हैस म्हातारी झाली होती.

(२) म्हैसआजीने रेडकूला काय काम सांगितले ?
उत्तर – म्हैस आजीने रेडकूला नदीपलीकडच्या कडबाकुट्टीवरून कडबा कापून आणायचे काम सांगितले.

(३) नदीकाठी जाताना रेडकूने सोबत काय नेले ?
उत्तर – नदीकाठी जाताना रेडकूने पाठीवर कडब्याची पेंढी व रिकामे पोतेसुद्धा सोबत नेले.

(४) बैलकाका नदीकाठी काय करत होते ?
उत्तर – बैलकाका नदीकाठी चरत होते.

(५) खारूताईने सूचना देताच काय झाले ?
उत्तर – खारूताई सूचना देताच रेडकू विचारात पडून गोंधळला व घरी परत गेला.

(६) म्हैस आजीने रेडकूला कोणाची, कोणाशी तुलना करून समजाविले? उत्तर- म्हैसआजीने रेडकूला बैलकाका, रेडकू आणि खारूताई याची तुलना करून समजाविले.

Leave a Reply