तिसरी मराठी मुसळधार पावासाने वरोरा जलमय

(१) कुठला परिसर पावसाने जलमय झाला ?
उत्तर- वरोरा

(२) पाऊस केव्हा सुरू झाला ?
उत्तर-काल दुपारी

(३) लोकांना कशाचा अंदाज नव्हता ?
उत्तर-आज पाऊस येईल याचा

(४) कामावर गेलेले लोक व शाळेतील मुले यांची फजिती कशाने झाली ?
उत्तर-छत्र्या

(५) चंद्रपूर जिल्ह्यात कशा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे ?
उत्तर-मध्यम

स्वाध्याय प्रश्न
१ एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) बातमी कशाविषयीची आहे ? उत्तर- बातमी वरोऱ्यातील मुसळधार पावसाची

(आ) बातमीचे शीर्षक काय आहे ? • वाचा.
उत्तर – ‘मुसळधार पावसाने वरोरा जलमय’ हे बातमीचे शीर्षक आहे.

(इ) शीर्षकावरून तुम्हाला काय कळले ? अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा. उत्तर- शीर्षकावरून असे कळते की वरोऱ्यात मुसळधार पाऊस झाला. यासाठी दुसरे शीर्षक ‘वरोऱ्याला मुसळधार पावसाने झोडपले.’

(ई) वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागांत पाणी साचले ?
उत्तर – वरोऱ्यामध्ये बसस्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता आणि शिक्षक वसाहत या सर्व भागात पाणी साचले.

(उ) वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे, ते बातमीच्या कोणत्या वाक्यावरून समजते ?
उत्तर – वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना, शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. ‘वरोरा तालुका चंद्रपूर जिल्हयात आहे या वाक्यावरून समजते.

(ऊ) ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे ? ते कसे ठरवले ?
उत्तर- ‘संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पहात होते.’ या वाक्यावरून ही बातमी जुलै महिन्यातील आहे हे ठरवले.

(ए) वरील बातमीतील जोडाक्षर असणारे शब्द शोधा लिहा. त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा
उत्तर- आमच्या झालेल्या चारच्या, बसस्थानकाचा, रस्ता, नव्हता, गेल्यामुळे, छत्र्या, आपआपल्या ओसरल्यावर, तालुक्यात जिल्ह्याचा, जिल्ह्यात, मध्यम, स्वरूपाचा, पडण्याची शक्यता, खात्याने.

Leave a Reply