मी अनुभवलेली सकाळ

माझे काका अमेरिकेहून येणार होते. त्यांचे विमान पहाटे पाचच्या सुमारास येणार होते, म्हणून आम्ही सर्वजण विमानतळावर पोहोचलो होतो. पण काही तांत्रिक अडचणींमुळे विमान दोन तास उशिरा येणार असे जाहीर झाले. वेळ फुकट गेला म्हणून आई-बाबांना, काकूला वाईट वाटले, पण मी मात्र आनंदित झालो होतो. कारण यापूर्वी कधी ही न पाहिलेल्या अरुणोदयाचे दर्शन मला होणार होते.त्या रम्य सकाळचे ते अनोखे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्याची संधी मला मिळाली होती. ती अनुभवलेली सकाळ मी कधीही विसरू शकणार नाही. आम्ही जेव्हा विमानतळावर पोहोचलो तेव्हा सर्वत्र अंधार होता आकाशाच्या काळ्यानिळ्या पटलावर चांदण्या टिकल्यांसारख्या चमचमत होत्या. मध्येच एखादा तेजस्वी तारा उदन दिसत होता. जसा वेळ जाऊ लागला तसा अंधाराचा दाटपणा निवळू लागला. पूर्व दिशेला आकाशात काही गडबड दिसू लागली. अजून. छान दिसत नव्हते. तेवढ्यात बाबा म्हणाले “झुंजूमुंजू झाले.
विमानतळाच्या त्या उंच गच्चीवरून दिसत होती भावतालची मुंबई आकाश जस-जसे निवळू लागले तसतशी जणु काही मुंबई नगरीला जाग येत होती आणि हे सगळे मी पाहत असतानाच अचानक आकशात लाल रंग उधळला गेला. अहाहा । एका लाल रंगाच्या कितीतरी भिन्न-भिन्न छटा होत्या, तेवढ्यात आई म्हणाली “तांबडं फुटलं ग बाई, अरुणोदय झाला केव्हा यायचं विमान.” आम्ही हे सार पाहत असतानाच सकाळ झाली. झाडे जागी झाली होती पक्ष्यांनी किलबिल सुरु झाली. अंगाला झोबणारा गार वारा कमी झाला आणि त्या अरुणोदयाचा आल्हाददायक स्पर्श हवाहवासा वाटू लागला ते दृश्य कायमचेच टिकून राहावे असे वाटू लागले. जणू काही त्या रम्य सकाळमध्ये नवजाणिवा, नवचैतन्य देणाऱ्या प्रेरणाच होत्या पण तो हवाहवासा वाटणारा क्षण कमी होऊ लागला आणि सकाळचे नवचैतन्य घेऊन मी काकांचे विमान आल्यानंतर तिकडे धाव घेतली.
खरोखरच मी अनुभवलेली तो अविस्मरणीय सकाळ मी कधीच विसरणार नाही. ते वातावरण पाहून किती उत्साह निर्माण झाला होता माझ्यात त्याचे वर्णन मला शब्दात करणे अशक्यच आहे. पण ती सकाळ माझ्या आयुष्यपटलावर कायमची रेखाटली जाणार यात शंकाच नाही.

Leave a Reply