शाळेचा निरोप समारंभ

आमचे दहावीचं वर्ष अभ्यास करता करता कसं संपलं नाही. हा विचार करत असताना मी भूतकाळात शिरले. आईचे बोट धरून, खांद्याला पुस्तकांपेक्षा खाऊच्या डब्याचे वजन जास्त असलेले दप्तर घेऊन, डोळ्यातले अश्रू पुसत बालवाडीत जाणारी लहान लहान मुले पुस्तकांच्या वाढत्या बोजाबरोबर शाळेशी आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी इतकी एकरूप होता की, शेवटी शाळेचा निरोप घेताना आपण आपल्या मैत्रिणींना पुन्हा भेटणार नाही, आपल्याला घडविणया या वास्तूत हक्काने येऊ शकणार नाही, की आपल्या प्रिय गुरुजनांना भेटणार नाही या विचाराने, दाटल्या कंठाने व भरल्या डोळ्याने शाळेबाहेर पडावे लागते. असे मनात विचार येत होते. काय बोलावे हे समजत नव्हते.
हसवणाऱ्या, लाजवणाऱ्या, थोडीशी कटुता उत्पन्न करणाऱ्या परंतु हव्याहव्याशा वाटणाऱ्या, लाजवणाऱ्या, थोडीशी कटुता उत्पन्न करणाऱ्या परंतु हव्याहव्याशा वाटणाऱ्या स्मृती आज उफाळुन वर येत होत्या. भरल्या अंतःकरणाने मी त्या दिवशी शाळेत प्रवेश केला. रोजची परिचयाची शाळा आज मला परकी वाटत होती.प्रवेशद्वारात सुस्वागतम्ची भली मोठी रांगोळी काढली होती. सर्व शिक्षक आमच्या स्वागतासाठी उभे राहिले होते. सभागृहात गेलो तर त्याचाही नक्षा पूर्णपणे बदलला होता. आजवर ज्या विद्यार्थ्यांनी शाळेला उत्कृष्ट यश मिळवून दिले त्यांची काही छायाचित्रे ठेवली होती. सर्व वातावरण प्रेमाने आणि सुंगधाने फुलून गेले होते. नियोजित वेळात कार्यक्रमाला सुरवात झाली. ज्या शाळेने आपल्याला संस्कारक्षम केले, अथांग पसरलेल्या या जगाच्या महासागरात आत्मविश्वासाची नाव देऊन इवेंचे क्षितिज ओलांडण्याचे बळ दिले. त्या शाळेचा निरोप घेणे या गोष्टीची कल्पना करवत नव्हती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमच्या मराठीच्या सरांनी केले. मुख्यध्यापकांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मग विद्याव्यांच्या मनोगताला सुरुवात झाली. १० वर्षात मित्रप्रेमाचे गुंफलेले धागे तोडताना किती यातना होतात हे विद्याथ्र्यांच्या भावनातून कळत होते. काहींच्या भारावलेल्या कंठातून शब्च फुटेनात, सारेच वातावरण गंभीर झाले होते. सगळ्यांचा डोळे ओले झाले होते.
खरंच, आमच्या शाळेने आम्हांला खूप काही दिले. एक यशस्वी मार्ग शोधण्याची स्वप्नेही दाखविली. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, जिद्द आणि स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची शक्ती दिली. यशाची गुरुकिल्ली याच शाळेत सापडली. या शाळेने आम्हांला बोचरी शिस्तही लावली आणि आपलेपणाचा ओलावाही निर्माण केला. या शालेय जीवनात कटुता आहे. राग आहे, परंतु प्रेमही आहे. मीसुद्धा माझे मनोगत व्यक्त केले. खूप तयारी केली होती पण राइच कंठातून बाहेर पडेना. फक्त भिरभिर पहात होते. थांबून थांबून काहीतरी बडबडत होते. माझी का अशी अवस्था झाली मलाच कळेना. शेवटी मी “अशी पाखरे येती स्मृती ठेवूनी जाती ”
असे म्हणून व्यासपीठावरून माझी रजा घेतली आणि खाली मान घालून बसले. नंतर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने मी भानावर आले. मुख्यध्यापकांचे भाषण संपले होते. नंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला. शेवटी माझ्या मैत्रिणीने, “अखेरचा हा तुला दंडवत…” हे गाणे म्हटले. आता समारंभ जवळ जवळ संपल्यासारखाच होता. पण तरीसुद्धा आमचे पाय शाळेतून बाहेर पडत नव्हते. या वास्तूतून आमच्या शालेय जीवनातील अनेक आठवणी दडलेल्या होत्या. स्था आठवणींना उजाळा देत गुरुजनांचा आणि मित्रपरिवारांचा निरोप घेऊन कसेबसे शाळेबाहेर पाऊल टाकले. माझ्या शाळेच्या भव्य वास्तुपुढे मी जाता जाता नतमस्तक झाले आणि जड पावलांनी मी घराच्या दिशेने जाऊ लागले.

Leave a Reply