विज्ञान शाप की वरदान?

‘नियमन असे मनुजासाठी, मानव नसे नियमनासाठी जाणा परंतु हे न जाणता आजच्या यंत्रयुगात आपण लहान सहान वस्तूंपासून तर मोठ्या अवजारापर्यंत पूर्णपणे विज्ञानाच्या अधीन झालेले आहोत. ‘विज्ञान’हा देव दैत्य आणि जादूगर आहे विज्ञानाचे चमत्कार पाहून आपण त्याला ‘देव’ मानायला तयार होतो वीजप्रवाह खंडित होऊन पुन्हा सुरू झाला की आपण म्हणतो की देवासारखी लाईन आली बाबा धावून अगदी गरजेच्या वेळी साता समुद्रापलीकडच्या गोष्टी लोककथेतून ऐकल्या होत्या. आता दूरदर्शनाच्या माध्यमातून तो भूप्रदेश, लोकसंस्कृती, खेळांचे सामने सारे काही घरी बसून पाहता येतात. म्हणून विज्ञान हा आजच्या युगातला देव आहे.
रेल्वे अपघात, बस अपघात यातील अपघाताची भीषणता जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा सहज वाटते, यापेक्षा पूर्वीचे जीवन किती चांगले होते वीज देवासारखी वाटणाऱ्याकडे इलेक्ट्रिकचा शॉक लागून कोणाचा मृत्यू झाला तर विज्ञान हा दैत्यासारखा वाटू लागतो मानवाने आपल्या बुद्धीचा कल्पकतेने वापर करून ही निर्मिती केली निर्मिती करताना ही हितकारक की अहितकारक याचा विचार केला नाही सतसद्विवेक बुद्धीचा विचार केला असता तर हिरोशिमा नागासाकीचा एवढा संहार, ती अपरिमित हानी झाली नसती शास्त्रज्ञांच्या जिज्ञासेतून अॅटमबॉम्ब, न्यूट्रॉन बॉम्ब निर्माण झाले स्वतःच्या सामर्थ्याची परीक्षा पाहण्यासाठी नीतिमत्तेचा विचार न करता मानव संहाराच्या दिशेने जाऊ लागला. जो तो स्वार्थलोलूप, सत्तालोलूप, धनलोलूप झाला आणि मानव्य हरवून बसला
विज्ञानाने मानवाला मानव्यापासून दूर लोटले तरीसुद्धा आम्ही मात्र विज्ञानाला दूर लोटू शकत नाही कारण याच विज्ञानाने आमच्या जीवनात प्रगतीचा प्रकाश आणला मानवाचे जीवन सुखमय केले. बालमृत्यूचे प्रमाण कमी केले. मनुष्य खऱ्या अर्थाने जीवनाचा आस्वाद घ्यायला शिकला तो विज्ञानामुळेच मनुष्याची झेप पृथ्वीपासून चंद्राकडे. मंगळाकडे जाऊ लागली आहे त्याच्या शोधाला अंत नाही. प्रगतीसाठी गती आवश्यक हे सूत्र त्याला चांगले अवगत झाले आहे. गती आणली नाही तर अधोगतीच्या दुष्ट चक्रात मनुष्य गुरफटल्याशिवाय राहणार नाही
मानवाला विज्ञानाची मदत घेत जर स्वतःची देशाची आणि विश्वाची प्रगती करायची असेल तर शाप आणि वरदान यातला सुवर्णमध्य साधता आला पाहिजे विज्ञानाचा अतिरेकी वापर थांबविला पाहिजे. संहारक वैज्ञानिक शक्तीपासून अलिप्त राहणे त्याला जमले पाहिजे विज्ञानाची बैठक अनितीच्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. तिला पुन श्च नीतीमध्ये परिवर्तित केल्यास विज्ञान शाप वाटण्याऐवजी निश्चितच वरदान ठरेल यात शंका नाही.

Leave a Reply