मी पाहिलेला क्रिकेटचा सामना

लहानपणी मित्रांबरोबर क्रिकेटचा खेळ खेळताना मी नेहमी चिडत असे. मला आऊट व्हायला आवडत नसे आणि नेहमी तेच माझ्या नशिबी येत असे. मला क्रिकेट खेळण्याची जशी आवड होती तसेच क्रिकेटचा सामना पहायलाही खूप आवडत असे. खरं तर आपण अनेक सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर घरबसल्या पहातो आणि ते अशक्य असल्यास रेडिओवरून ऐकतो. पण प्रत्यक्ष मैदानात आणि तोही अगदी जवळून एखादा चुरशीचा सामना पाहण्यातील आनंद काही वेगळाच असतो.
मी पाहिलेला असाच एक चुरशीचा सामना मी कधी विसरणार नाही. हा समाना म्हणजे माझ्या शालेय जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंगच, तेव्हा मी ९ वीत होतो. मंगळवार दि. ३०.३.९९ रोजी भारत-श्रीलंका यांच्यात सामना होता. माझ्या बाबांनी दोनच तिकिटे काढून आणली आणि मला म्हणाले, “ मी दोनच तिकिटे काढून आणली आहेत तुझी आई आणि मी जाणार आहे, तुझी परिक्षा तोंडावर आली आहे. तू अभ्यास करत बस”. पुढे ते काहीतरी बोलणार होते पण मला ते ऐकवेना आणि मी भोकाड वासले. काही केल्या रडायचे थांबेना तेव्हा माझ्या आईने माघार घेतली आणि ती घरी बसली, मी बाबांबरोबर क्रिकेट पाहण्यासाठी नेहरू स्टेडियमला गेलो. गर्दी तर तोबा होती. आम्ही त्या गर्दीतून प्रवेशद्वारात पोहोचलो, तिकिटे दाखविली आणि आतमध्ये गेलो. मला एकच उत्सुकता लागली होती की, सचिन तेंडूलकरला खेळताना बघायचे होते. सामन्याला बरोबरनऊ वाजता सुरवात झाली. मी आणि बाबा एकदम पुढे आणि कडेला होतो. त्यामुळे सचिन तेंडूलकर आणि रणतुंगा हे अगदी आमच्याजवळून गेले. मी नकळत सचिनला हातही लावला. ते दोघेही खर्णधार असल्याने मैदानात छापा काटा करण्यासाठी गेले. सचिनने नाणेफेक जिंकली आणि प्रथम बॅटींग घेतली. मला खूप आनंद झाला. आता प्रथम सचिन खेळायला येणार. मी त्याच्या प्रत्येक कृतीकडे बारकाईने पहात होतो. त्याच्याबरोबर अजय जडेजा होता.
आपण खेळ खेळताना कसे खेळतो आणि प्रत्यक्षात कसा खेळला जातो यातील तफावत मी बारकाईने टिपत होतो. सचिनने आल्याबरोबर धावा जमवायला सुरवात केली आणि अजय जडेजालाही तो साथ देत होता. त्या दोघांच्या खेळण्यातून असे आजिबात वाटत नव्हते की, केवळ आपल्याच धावा जास्त व्हाव्यात. दोघेही धावा करण्यासाठी एकमेकांना साथ देत होते. तेवढ्यात जडेजा धावबाद झाला. मग सचिन कर्णधार असल्याने कदाचित त्याने परत संथ गतीने खेळायला सुरुवात केली. परंतु जसजशा धावा जमत गेल्या आणि सौरव गांगुलीबरोबर त्याने चांगल्याच धावा जमविल्या.’ माझ्या मनात खरंच सांगतो यावेळस एकच विचार येत होता सौरव गांगुली बाद झाला तरी चालेल पण सचिन व्हायला नको. माझी स्वार्थी भावना मला खूप महागात पडली आणि सचिनने जोरात टोला मारला आणि चेंडू रंगतुंगाच्या हातात गेला. मला खूप वाईट वाटले. सचिन ग्राउंडमधून खाली मान घालुन बाहेर येत होता. तेव्हा माझ्याच डोळ्यात पाणी तरातरले. त्यानंतर माझे सामन्याकडे नीट लक्षच लागेना.
परंतु सचिननंतर एकामागोमाग सर्व लगेच बाद झाले आणि खुप धावांचे आव्हान श्रीलंकेसमोर त्यांनी ठेवले. मला क्रिकेट पहाण्यात रस वाटत नव्हता. पण नंतर त्यांचाही तशीच स्थिती झाल्यानंतर मला सामन्यात रस वाटायला लागला. आपण जिंकू अशी आशा वाटायला लागली. पण निराशा झाली. या सामन्याचे मला सुख एवढेच होते की, मी सचिनला जवळून पाहिले आणि श्रीलंकेचे सगळे खेळाडूही अगदी जवळून,

Leave a Reply