बालपणीचा काळ सुखाचा

“लकडी की काठी, काठी पे घोडा घोडे के दुम पर जोमारा हतोडा दौडा दौडा दौडा घोडा, दुम उठाके दौडा.” “लहानपण….. रवा”
“रम्य असे बालपण” तुकारामांनाही हवेहवेसे वाटत होते. तुकारामांनाच काय सर्वांनाच असं वाटत की, बालपण कधी संपूच नये. मनुष्याच्या आयुष्यातली सर्वात आनंदाची अवस्था म्हणजे बाल्यावस्थाच होय. बालपणासारखा निर्भेळ आनंद नंतर केव्हाही मिळू शकत नाही; कारण या काळात चिंता, काळजी, स्वार्थ या वाईट विकारांपासून आपण खूप दूर असतो. ‘बच्चे मन के सच्चे’ ही “सच्चाई” बालकाला या अवस्थेतच प्राप्त झालेली असते.
बालपणाचे हट्टही मोठे मजेदार असतात. या हट्टी वृत्तीतून प्रत्यक्ष प्रभुरामचंद्रही सुटले नाहीत. आकाशातल्या चंद्राचीच मागणी त्यांनी केली होती. रडणे, ओरडणे, किंचाळणे, हात पाय झाडणे या सर्व प्रकारांच्या माध्यमातून आपण आपला हट्ट पुरवू शकतो. स्वच्छंदी जीवन जगण्याची मुभा या वयात मिळाली असते. मन मानेल तिकडे जावे, खावे, गावे, हसावे हुंदडावे यावर कुणाचेही बंधन नसते. त्यावेळेला असे वाटते; ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे’ मनाला वाटेल तेव्हा उठावे, आईच्या हाताने घास भरवून घ्यावा. तिच्या मांडीवर झोपावे, तिची गाणी ऐकावी, आजीकडून गोष्ट ऐकावी, ऐकता ऐकता झोपी जावे, झोपतानाही गाढ झोप लागावी, म्हणून आईच्या गोड आवाजात अंगाई गीत ऐकता ऐकता गाढ झोपघ्यावी. किती मस्त ही दैनंदिनी। लहान म्हणून सर्व गुन्हे माफ, सर्वच क्षम्य आईचे हे प्रेम, वात्सल्य बालवयात कसे भरभरून मिळते. ते पाहून प्रत्यक्ष विधात्यालाही हेवा वाटावा
शाळेची अभ्यासाची परीक्षेची कटकट नाही आपण कोणत्या गोष्टीचा हट्ट करायचा अवकाश की ती वस्तू हजर होते. आजी आजोबा, आई-बाबा, ताई हे सर्व लाड पुरवतातच; पण शेजारपाजारचे, नातेवाईकसुद्धा प्रेमाचा वर्षाव करत असतात, नातेवाईक गावाला जाताना हातावर पैसे ठेवतात आल्याआल्या खाऊ देतात सर्वाच्या अंतःकरणात आपण स्थान मिळवलं असत- आनंदाचे कारंजे, आनंदाचे तुषार उडवून आनंदाची प्राप्ती करवून दिली जाते. लहानपणचे भांडणसुद्धा मजेशीर असते. एखाद्या खेळण्यासाठी खूप भांडायचे, रडारड करायची, मारामारी करायची, या लुटूपुटीच्या भांडणात मोठ्यांनाही सक्रिय सहभाग घ्यायला लावायचा आणि आपण मात्र नामानिराळे व्हायचे पुन्हा भांडण विसरून खेळायचे किती मज्जा येते यातसुद्धा
बालपणच्या रम्य आठवणीची शिदोरी आयुष्यभर आपल्याबरोबर असते. ती कधी सरतही नाही आणि तिच्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप बालवयापासून पडली असते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते याच अर्थाने जो आपले बालपण विसरतो तो जीवनातील संवेदनांपासून अलिप्त राहतो. बालपणीचे संस्कार हे जीवनशाळेचे पहिले पाठ असतात. त्यात यशस्वी होणारा आयुष्यात सर्व क्षेत्रात यशस्वी होतो म्हणूनच म्हणतात ‘रम्य ते बालपण

Leave a Reply