माझे श्रद्धास्थान: शिवाजी महाराज

शिवाजी महाराज “शिवरायाचे आठवावे रूप; शिवरायांचा आठवावा प्रताप’ संत रामदासांनी शिवाजी महाराजांविषयी जे उद्गार काढलेल्या जराही अतिशयोक्ती नाही. कीर्तिवंत, गुणवंत विद्यावंत असे महाराज शिवाजी या भूतलावर एकमेवाद्वितीय ठरले. असा राजा पुन्हा होणे नाही. शून्यातून विश्वाची निर्मिती करावी त्याप्रमाणे स्वत:जवळ राज्य नाही, शस्त्र नाही, धन नाही, असे असताना हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज केवढे महत्त्वाकांक्षी होते. त्यांचे ध म्हणजे जिजामाता, त्यांचे शस्त्र म्हणजे खाल्ल्या मिठाला जागणारा, जीवाला जीव देणारा मावळा मराठा, आणि त्यांचे राज्य म्हणजे अख्खा महाराष्ट्र; पण मोगलांच्या ताब्यात असलेला!.
महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात, डोंगराळ भागातील किल्ल्याचा भगवा फडकू लागला आणि त्याने दिल्लीच्या शहेनशहा औरंगजेबाची झोप उडाली. तो सैन्यासह जातीनिशी महाराष्ट्रात तळ ठोकून राहिला; पण शिवाजींच्या गनिमी काव्यापुढे त्याला नांगी टाकावी लागली. शाहिस्तेखानाला आपली बोटे गमवावी लागली, तर अफजलखानाला जीव गमवावा लागला. ज्या औरंगजेबाने शिवाजीला ‘चूहा’ म्हणून हिणवले त्यालाही कळून चुकले की हा ‘चूहा’ आपल्याला सुखाची झोप घेऊ देणार नाही.
‘हिंदवी स्वराज्य’ स्थापणारे शिवाजी कर्तृत्व आणि प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारे होते; म्हणून ‘हे तो श्रीचे राज्य’ म्हणून त्यांनी परमेश्वरालाच आपल्या विजयाचा साक्षीदार मानले व आपली निष्ठा व्यक्त केली. भवानीमातेकडून वरदहस्त घेतला.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले व भारताने ‘लोकशाही पध्दतीचा’ स्वीकार केला, पण शिवाजी राजांनी कितीतरी वर्षापूर्वी आपल्या राज्यात लोकशाही आणली. अष्टप्रधान मंत्रिमंडळ नेमले; त्यामुळे शिवाजी हेच लोकशाहीचे पहिले पुरस्कर्ते होत. शिवाजीच्या सैन्यात सर्व जातीधर्मांचे लोक होते, त्यामुळे शिवाजी फक्त ‘हिंदूंचे राजे’ होते असे म्हणणे चुकीचे ठरते. याउलट निंबाळकर, घोरपडे हे त्यांचे नातेवाईक शिवाजींना फितूर झाले. म्हणजे शिवाजी महाराज मानवतेची पूजारी होते. त्यांच्या उदारमतवादी धोरणात जात,धर्म, नातेवाईक अशी संकुचित चौकट नव्हती. त्यांनी या सरकारचे बाळकडू जिजामातेकडून घेतले होते. पराक्रमाची पूजा दादोजींनी त्यांच्याकडून करवून घेतली होती. भवानीने साक्षात्कार घडवून सावध राहण्याविषयी सांगितले होते.
शिवाजींचे चरित्र म्हणजे एक महानाट्य आहे. ज्यात पराक्रम आहे, चमत्कार आहे; जिज्ञासा आहे, म्हणूनच श्रेष्ठ साहित्यिक नरहर कुरूंदकर यांनी ‘शिवाजीला अवतारी पुरुष का म्हणू नये’ या प्रश्नाचा सविस्तर उहापोह केला आहे

Leave a Reply