प्रदूषण एक समस्या

‘प्रदूषण एक समस्या’
अंगावर आदळणारी गर्दी, शहरांचा असा वेग, हरतऱ्हेचे अटळ प्रदूषण, बेकारी, दारिद्रय, गुन्हेगारी अशा अनेक समस्या भारतापुढे ‘आ’ वासून उभ्या आहेत. यातील प्रदूषण’ ही समस्या तर आपल्याला आरोग्याला घातक अशी आहे.
भारतात औद्योगिकरण आले आणि कारखानदारी वेगाने वाढली. पूर्ण विचाराअभावी आणि नियोजनाअभावी सुरू झालेल्या कारखानदारीने हवेचे प्रदूषण निर्माण केले हे आपल्या लक्षातसुद्धा आले नाही. तसेच, कारखान्यातील अस्वच्छ, दूषित पाण्यामुळे नद्या व समुद्र यांचे पाणी दूषित झाल्याने ते पिण्यायोग्य राहिले नाही. कितीतरी लोक नदी, कालवा अशा ठिकाणी निर्माल्य, नारळ, नैवेद्य टाकतात. त्यामुळे गंगा-शुद्धिकरणाचा प्रकल्प हाती घ्यावा लागतो. परंतु ते दूषित होणार नाही. प्रदूषण टाळण्यासाठी कारखान्यांभोवती भरपूर झाडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी कारखान्यांचे विकेंद्रीकरण केले पाहिजे हे लक्षात न घेतल्याने औद्योगिक विभागात प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. आपली अस्वच्छता ही प्रदूषणाला कारणीभूत आहे. आपण वैयाक्तिक स्वच्छता ठेवतो परंतु सार्वजनिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. स्वतःच्या घरातील कचरा रस्त्यावर फेकतो. पान, गुटखा यांच्या पिचकाऱ्या रस्त्यावर टाकल्या जातात. या घाणीमुळे हवा दूषित होते आणि प्रदूषण वाढते.
पाणी, हवा याबरोबर ध्वनिप्रदूषण हीसुद्धा एक मोठी ज्वलंत समस्या ठरली आहे. कर्कश आणि मानसिक संतुलन बिघडविणाऱ्या मनुष्यास त्रास होतो. आपल्या आसपास वाहने, कारखाने, विमाने, मशिने इ.चा. त्रासदायक आवाज होतो व याचा परिणाम प्रामुख्याने मेंदूवर, किंबहुना संपूर्ण शरीरावर होऊन मनुष्याचे जीवन धोक्यात येते. निद्रानाश, डोकेदुखी, कमी ऐकू येणे यांसारखे विकार जाडतात. अनपेक्षितपणे कर्कश आवाज कानावर आदळल्यास बुबुळे विस्फारतात, आतडी आवळली जाऊन पोटात कळा येतात, आणि ही समस्या तर शहरासारख्या ठिकाणी आपल्याला अधिक प्रमाणात आढळते. कारण शहरात जागा कमी आणि गर्दी जास्त अशी आवस्था आहे. घरे शेजारी शेजारी असतात त्यामुळे एका घरातील रेडिओ, टी.व्हीचा आवाज दुसऱ्या घरात येतो आणि इच्छा नसताना तो ऐकावे लागते. तसेच आज वेगवेगळे प्रत्येकाकडे खाजगी वाहन आहे. तसेच बस,ट्रक यासारखी वाहने वरचेवर दुरुस्त केली जात नाहीत आणि त्यामुळे ही वाहने प्रचंड प्रमाणात आढळते. कारण शहरात कमी जागा आणि जास्त गर्दी अशी अवस्था आहे. घरे शेजारी शेजारी असतात त्यामुळे एका घरातील रेडिओ, टी. व्हीचा आवाज दुसऱ्या घरात येतो आणि इच्छा नसताना ते ऐकावे लागते. तसेच आज वेगवेगळे कार्यक्रम, उत्सवप्रसंगी स्पीकर ही एक फॅशनच झाली आहे. आणि आता लोकसंख्येने १०० कोटींचा आकडा ओलांडला, हे तर ट्ठापल्याला माहितच आहे पण शहरात अशी परिस्थिती दिसते की आज जवळजवळ प्रत्येकाकडे खाजगी वाहन आहे. तसेच बस, ट्रक यांसारखी वाहने वरचेवर दुरुस्त केली जात नाहीत आणि त्यामुळे ही वाहने प्रचंड प्रमाणात धुर ओकतात. त्या धुरातून कार्बन मोनॉक्साईड वायू बाहेर पडतो. तो आपल्या शरीराला अपायकारक आहे. त्यामुळे हृदयाचे, श्वसनसंस्थेचे रोग होण्याचा संभव असतो. सिग्रलच्या ठिकाणी तर अनेक वाहने एका वेळी एका ठिकाणी चालू अवस्थेत असतात आणि त्यामुळे त्यांच्यामधून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर निघतो.
हे सगळे पाहिल्यानंतर प्रदूषण समस्येची भयानकता आपल्याला जाणवते आणि आता तर ही भयानकता फारच धोकादायक वाटत आहे. कारण पृथ्वीच्या पर्यावरणाच्या बाहेर सर्वत्र ओझोन वायू आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी हा वायू आवश्यक आहे. पृथ्वीवरील वाढत्या प्रदुषणामुळे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. हा वायू ओझोनवर हल्ला करत आहे आणि या हल्लयात ओझोनचा पराभव झाला तर सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीवर येतील व येथील सजीव सृष्टी नष्ट होईल अशी भीती वाटते. यावर उपाय एकच प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा’ हे सूत्र सगळ्यांना उमगले पाहिजे. तरच आपली या बिकट समस्येतून सुटका होऊ शकेल.

Leave a Reply