ग्रंथ हेच गुरु

‘खरेतर शब्द हे ज्ञानाने भरलेले असतात तर पुस्तके हे शब्दांनी भरलेले असतात. शब्द हा जर ज्ञानाचा थेंब असेल तर पुस्तक हे ज्ञानाचा सागर आहे. पुस्तके माणसाला ज्ञानाच्या सफरीवर घेऊन जातात आणि जीवनाचा प्रवास सुखकारक करतात हीच पुस्तके जीवनाची मार्गदर्शक होतात आणि त्यानंतर ती वाचकांना गुरुस्थांनी वाटतात. त्यामुळेच म्हटले जाते की ग्रंथ हेच गुरुअध्यात्मानुसार प्रत्येक माणसाला अठ्ठावीस गुरु करतात येतात. मला नेहमी वाटते की हे अलावीस माणसे नसून चार वेद सहाशास्त्र आणि अठरा पुराणे ही जी ग्रंथ आहेत ती असावीत कारण अंदासारखे निरपेक्ष मार्गदर्शन करणारे या संपूर्ण विश्वामध्ये कोणी नाही भगवद्गीते सारख्या ग्रंथाने स्वामी विवेकानंदातील ‘विवेकाला’ जागृत केले. ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी सांगायला लावली तर विनोबाची गीताई धरतीवर आणली. पुस्तकासारखा परममित्र दुसरा कोणीही नाही’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते अगदी खरेच आहे कारण पुस्तके कधीही माणसाला एकटेपण भासू देत नाही. अगदी मित्र मंडळीत असतांना मिळतो तसा. पुस्तके मनोरंजन करतात, पुस्तके नितिमत्ता शिकवितात पुस्तके माणसांचे व्यक्तिमत्व घडवितात म्हणून तर मोठ-मोठ्या महापुरुषांनी पुस्तकांना आपल्या जीवनामध्ये महत्वाचे स्थान आहे खरं सांगायचं झालं तर चालकाला लहानपणापासून वाचनाची गोडी त्यांची माताच लावू शकते कारण ही लहान मुले आईच्या ..सहवासात जास्त काळ राहत असतात या लहान मुलांचे मन अतिशय संस्कारक्षम असते असे अनेक नावाजलेले लेखक शास्त्रज्ञ, तत्ववेत्ते हे एकदम निर्माण झालेत का? मुळीच नाही तर या वाचनाचे संस्कारर करणाऱ्या मातांचेच हे महान पुत्र होत या वाचनांमुळे अनेक महान लोक प्रसिद्धीस आले उदा यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, शिरीषकुमार इत्यादी यशवंतराव चव्हाणांनी अनेक पुस्तके वाचली म्हणूनच वाचनासारख्या या विरंगुळ्यातुन त्यांनी पुढे युगांतर ऋणानुबंध भूमिका अशा महान पुस्तकांची निर्मिती केली. तसेच कृष्णाकठ सारखे त्यांचे आत्मचरित्र आबालवृद्धांपर्यंत प्रसिद्ध झाले आहे त्याचप्रमाणे गाव मॅक्झीम यांची आई’ ही कादंबरी मातेच्या वाचन संस्कारांमुळेच उदयाला आली तसेच साने गुरुजी तर वाचनाचे भुकेलेच होते अत्यंत बिकट परिस्थिती असतानाही पोटाच्या भुकेला चिमटा देऊन त्यांनी वाचनाची भूक भागवली आणि वाढवली. त्यातूनच त्यांचे एक अमर व्यक्तिमत्त्व जन्माला आले ‘श्यामची आई’ यातून एक नामवंत लेखक म्हणून ते भारतीयांच्या मनात घर करून बसले त्याचप्रमाणे ‘शिरीषकुमार’ हा तुमच्याच वयाचा. त्याने शिवाजी महाराजांसारख्या पराक्रमी पुरुषांची चरित्रे वाचली. त्यातूनच त्याची धाडसी वृत्ती निर्माण झाली या शूराला तर किशोरवयातच इंग्रजांनी निदर्यपणे गोळी मारून ठार केले पण त्याची स्मृती या देशासाठी अमर झाली. सर्वसामान्यांना हे ज्ञान आत्मसात करायचे असेल तर त्यासाठी सर्वात उत्तम साधन म्हणजे नियमित पुस्तकांचे वाचन होय, कारण पुन्हा पुन्हा वाचन केल्यामुळे आपण वाचलेले जास्तीत जास्त लक्षात ठेऊ शकतो तसेच हे वाचन आपण सहज व अल्प खर्चाने किंवा थोड्याशा मेहनतीने व चिकाटीने प्राप्त करू शकतो.आपल्याला शिकवण्यासाठी अमुक एक विद्वान गुरुची आवश्यकता नाही, तर कोणतेही एक पुस्तक किंवा ग्रंथ घ्या. आपणाला ती गोष्ट सहज पुस्तक समजावून देईल. जीवनातील तत्वज्ञान व जीवनातील बारीक सारीक अनुभव यांनी आपले जीवन परिपूर्ण व संपन्न होते. एवढे महान कार्य फक्त ग्रंथच करु शकतात. म्हणून हे सर्व ग्रंथ एखाद्या गुरुसारखी वाटतात

Leave a Reply