अजून आम्ही अंधश्रध्देच्या भोवऱ्यात

अजून आम्ही अंधश्रध्देच्या भोवऱ्यातः
“देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कवळू द्या” या छोट्याशा ओळीतून कवी केशवसुतांनी फार मोठा अर्थ सांगितला आहे. देव आणि दानव माणसानेच निर्माण केले आहे. परंतु आजही लोकांच्या डोक्यात प्रकाश पडलेला दिसत नाही. आपण २१ •व्या शतकाकडे वाटचाल करतो आहोत. विज्ञानयुगात वावरतो, परंतु, अजूनही आम्ही अंधश्रेध्देच्या भोवऱ्यात वावरतो आहोत ही किती दुर्दैवाची गोष्ट ! . अंधश्रध्देचा विचार करण्यापूर्वी आपण प्रथम श्रध्देचा विचार केला पाहिजे. कारण श्रध्देला मानवी जीवनात खूप स्थान दिले जाते. श्रध्दा हे मानवी जीवनाचे मूल्य, प्रवृत्ती आहे. श्रध्देला मूर्त स्वरूप देण्यासाठी मूर्ती मानवानेच निर्माण केली आणि तिलाच देव मानलेआणि देवावर माणसाची श्रध्दा बसली माणूस आस्तिक बनला नंतर माणूस मूर्तीचे पूजन करायला लागला ह्या पूजनाची त्याने एक पध्दती ठरवली. तोपर्यंत मानवी जीवनात श्रध्देला शुध्द स्थान होते. नंतर या पूजेला अतिवास्तव महत्व प्राप्त झाले आणि यातूनच अंधश्रध्देचा जन्म झाला. श्रध्दा हे मानवी मनाला मिळालेले एक वरदान ठरले तर अंधश्रध्दा मानवी जीवनाला मिळालेला एक शाप ठरला. शहरापेक्षा ग्रामीण भागात अंधश्रध्दाळू लोक जास्त आढळतात. जर कोणी घरात आजारी पडलं तर ते दवाखान्यात न जाता देव-देवऋषी यांच्या पायावर माथे टेकवतात. मग त्यांच्या सांगण्यानुसार उपास करणे पूजा-अर्चा करणे, देवाला साकडे घालणे, नवस करणे, तो फेडणे इत्यादी गोष्टी करतात. अशा अंधश्रध्दाळूपणाने केलेल्या दैवी उपायामुळे आजारी माणूस काही बरा होत नाही. मग शेवटच्या क्षणाला त्याला कोणाच्या तरी सांगण्यावरून दवाखान्यात आणतात आणि मग त्याचा प्राण जातो तेव्हा परत त्याची अशी मनोवृत्ती तयार होते की दवाखान्यात आणल्यानेच त्याला लवकर मृत्यू आला. याबरोबरच अनेक अंधश्रध्देचे प्रकार खेडेगावात आपल्याला पाहायला मिळतात. सून घरात आली आणि काही दुःखद घटना घडली तर तिला पांढच्या पायाची म्हटले जाते. प्रसंगी तिला घरातूनही हाकलून दिले जाते, अंगात येणे, प्राण्यांचा बळी देणे, माणसाचा बळी देणे, अंगारा धुपारा करणे, जादू-टोणा करणे या सगळ्या गोष्टी निर्माण होतात त्या अंधश्रध्देपोटीच जर समाजातील अंधश्रध्दा दूर करायची असेल तर सर्व समाज सुशिक्षित झाला पाहिजे. आपल्याला श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात फरक समजणे आवश्यक आहे. परमेश्वरावर श्रध्दा ठेवावी की नाही ही आपली वैयक्तिक बाब आहे. परंतु ही श्रध्दा असली तरी तो आंधळी नसावी तर डोळस असावी. कारण ‘अंधश्रध्दा समाजसुधारणेतील फार मोठा अडसर ठरू शकेल. आज भारताला स्वातंत्र्य मिळून ५० कुसुमाग्रज तर आपल्या काव्यातून अशी विनवणी करतात की, “अज्ञानाच्या गळ्यात माव्य अभिमानाच्या घालू नका | अंधप्रथांच्या कुजट कोटरी दिवाभितासम दडू नका ||” अज्ञान आणि अंधश्रध्दा दूर करणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि तसे प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे. देव-दानव या संकल्पना समजून घेतल्या पाहिजे. श्रध्देच्या नावाखाली भोळ्या भाबड्या जनतेची जी फसवणूक होते ती दूर केली पाहिजे. जर प्रत्येक व्यक्तीने माणसातलाच देव शोधला तर अंधश्रध्देचे मूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. खरं तर माणूस हा बुध्दीवंत प्राणी आहे. तो स्वतःविचार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे आपण काय करतो ? कशासाठी करतो ? हा विचार करून जर आपण निर्णय घेतला तर अंधश्रध्दा दूर होणे अवघड नाही.

Leave a Reply