विदूषकाचे आत्मवृत्त

मला आठवते मी त्यावेळी होतो दहा-बारा वर्षांचा खूप उनाड नदीवर पोहायला जाणं, झाडावर चढून चिंचा, फैन्य पाहणं मला खूप खूप आवडायचं अभ्यास शाळा नकोशी वाटायची मी एकदा एका शेतात गुपचूप शिरलो आणि आंबे तोडायला झाडावर चढू लागलो. एवढ्यात कसा माझा तोल गेला काही समजत नाही मी खूप जोरानं पडलो जेवण शुद्धीवर आलो तेव्हा एका दवाखान्यात होती. डोक्याला जबर मार बसला माझ्यासारख्या उनाड पोरापायी आईवडिलांना वडिलोपार्जित शेती गमवावी लागली खूप पैसा माझ्यावर खर्च झाला होता काही दिवसांतच मी चालू फिरू लागलो, पण माझ्या पायाची हाई मात्र ताठ होऊ शकली नाहीत दोन्ही पायांना वाक आला होता. मी कसातरी चालायचो माझे चालणे पाहून सारी मुले मला हसायची. मी शारीरिक वेदनेपेक्षा त्यांच्या वाग्याणांनीच घायाळ होत होतो. काही दिवसांनी मला ‘विदूषक हे विशेषण मिळाले. गावातला जोकर असा माझा परिचय दिला जाऊ लागला. गरिबीमुळे आईवडील अधिक दुःखी झाले होते त्यांना आपली व्यथा सांगणं मला बरोबर वाटेना. त्यांच्यावर आपण भार म्हणून राहायच नाही असे मनात ठरवलं. माझ्यासारख्या सोंगाला जवळ उभे करायलाही कोणी तयार नसत मग नोकरी कोण देणार एक दिवस कोणीतरी मला डिवचल अरे ये जोकरा तुला फक्त जोकराचच काम जमेल की रे त्यांच्या उपहासातून अवहेलनेतूनच जीवनाचा नवा मार्ग दिसला आपण ‘विदूषक’ व्हायचे हे मनात ठरवले आणि एक दिवस घर सोडले तो आजतागायत घरी गेलो नाही; पण दर महिन्याला पाचशे रुपयाची मनिऑर्डर न चुकता घरी करतो सर्कसमध्ये आल्यावर सुरुवातीला या वातावरणात रुळायला मला वेळ लागला पण मला इथे सहानुभूती मिळाली. कारण प्रत्येकजण कुठल्यातरी दुःखाने पीडित होता. मला सर्व कसरती शिकवण्यात आल्या सर्वाना हसवणं ही कला मला उपजतच येत होती. सर्कसचा मालकही खूप प्रेमळ होता. मी एकदा तापाने फणफणलो होतो तेव्हा तर मालक स्वतः माझ्याजवळ बसून होते. खूप गावांमध्ये सर्कसचे खेळ केले. लोकांना हसविले. रमविले रिझविले आता माझ्या आयुष्याचा तिसरा अंक सुरू आहे. जीवनाच्या नाटकाचा शेवट गोड व्हावा अशी इच्छा आहे. आता मी विदूषकी चाळे करीत नाही कुणाला हसवीत नाही, की तंबूबाहेर पडत नाही. मी आयुष्यात कोणासमोर हात पसरला नाही काटकसरीने खर्च करीत गेलो. दर महिन्याला बँकेत शिल्लक ठेवत गेलो. आजही मला दर महिन्याला माझ्या खर्चापुरते पैसे मिळतात. माझ्या मृत्यूनंतर माझी शिल्लक मी सर्कसच्या मालकाच्या नावे करावी असे लिहिले असल्याने आजही कोणी मला इथून हाकलून देऊ शकत नाही. आजही यम माझ्यासमोर आला तर मी त्याच्याबरोबर हसत-हसत शेवटची सलामी देऊन जाईन.स्वातंत्र्यापूर्वी भारतातल्या प्रत्येक नागरिकाने गुलामगिरीचं दुःख भोगलं आहे. ते दुःख जेव्हा त्याला असा झाला त्याने स्वातंत्र्याच्या होमकुंडात आपल्या जीवन सर्वस्वाच्या समीधा टाकल्या आणि शेवटी त्यांना स्वातंत्र्याचे मधुर फळ चाखायला मिळाले पण माझ्या बाबतीत मात्र हा मनुष्य एवढा निष्ठुर का? त्याने मला या पिंजऱ्यात कोंडून ठेवले आहे. पारतंत्र्याच्या या दुःखाचे ओझे आता मलाही असह्य होत आहे. पण मी अगदी हवालदिल झालो आहे. स्वातंत्र्याचा रम्य काळ आठवणे तेवढे माझ्या हातात आहे मला आठवते ती हिरवी हिरवी वनराई, तो जंगलचा मेवा आणि मुख्य म्हणजे आईवडिलांची प्रेमळ सावली हे सारं सारं मी फक्त रोज आठवत असतो. या सान्या सुखापासून मी दुरावलो. माझे स्वातंत्र्य हिरावल्या गेले. माझे मित्र माझे नातेवाईक यांच्या आठवणी या भकास पिंजऱ्यात मी काढत असतो हे जग आता मला अगदी नकोसे झाले आहे. ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे असे वाटणाऱ्या माणसाला जाब विचारावासा वाटतो का रे बाबा माझ्या जीवनात तुला कुठे आनंद दिसतो का ? मला आठवतो तो माझ्या जीवनातला काळा दिवस तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. एका हिरव्यागार झाडावर मी स्वच्छंदपणे फळांचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात खाली कधी नव्हे ते कणसाचे दाणे पेरले आहेत, असा भास झाला. मी लगेच माझ्या मित्रांना बोलावले आणि आम्ही सर्वच्या सर्व खाली उतरलो. उतरताना कणसाचे कोवळे दाणे खायला मिळणार म्हणून केवढा आनंद झाला. पण एका क्षणात तो मावळला. आम्ही सर्वजण जायबंदी झालो होतो. आळे घेऊन सर्वच्या सर्व उडू म्हणून खूप ताकद एकवटली, पण व्यर्थ माणसांच्या दुष्टपणापुढे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. आम्ही सर्व पारध्यांचे गुलाम झालो होतो त्याने आम्हाला शहरात विकायला आणले. एका श्रीमंत माणसाने मला खरेदी केले पुन्हा माझी आणि माझ्या मित्रांची ताटातूट झाली. या सोन्याच्या पिंजऱ्यात माझ्या आवडीचे पदार्थ असतात पण त्या पदार्थावर पारतंत्र्याचे सावट पसरले असल्याने पदार्थातील गोडवा मला विषाप्रमाणे वाटतो. बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, झाडे, वेली पशु पाखरे यांशी गोष्ट करु, या गुलामगिरीचा शेवट माझ्या शेवटानेच होईल असेच मला वाटू लागले आहे. तरीपण एका आशेवर मी जगतो आहे की माझ्या मालकीतील माणुसकी जागी होईल आणि माझे स्वातंत्र्य मला पुन्हा मिळेल.

Leave a Reply