विज्ञानाचे फायदे-तोटे

‘हल्लीचे युग हे विज्ञानयुग आहे माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला. चन्द्रावरुन तो पृथ्वीवरिल माणसांशी बोलला.तेथील दगड गोटे जमा करून आणले. तसेच आपल्या दैनंदिन जीवनातही प्रवेश केला आहे. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या ज्या वस्तू वापरतो ते विज्ञानाच्या प्रगतीमुळेब म्हणजे आपले जवीन आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या हातात हात (घालून चालणान्या आहेत. विज्ञानाशिवाय मानवाचे जीवन असह्य होईल. आतापर्यंत विज्ञानात अनेक नवनवीन शोध नाही की जिथे विज्ञानाने प्रवेश केला नाही. मनुष्य जेव्हा या पृथ्वीतलावर अवतर तेव्हा तो रानटी अवस्थेत होता. कोणत्याच बाबतीत त्याची प्रगती नव्हती. पुढे त्याने प्रगती करायला सुरवात केली आणि त्याने हजारो शोध लावले गेल्या दिडशे वर्षात त्याने अशा शोधांचा अगदी पाऊसच पाडला, म्हणजेच विज्ञानाने मानवी संसारावर जो शृंगार केला तो खरोखरच अपर्व असा आहे. या विज्ञानाने मानवी जीवनात एवढा प्रवेश मिळविला की, श्वासगणिक विज्ञान त्याच्यापुढे दत्त म्हणून उभे आहे. आज बटण दाबले की टी. व्हीवर पूर्ण जगातल्या घडामोडी कळतात तर मिक्सरमध्ये कोणताही पदार्थ एका मिनिटात बारीक करता येतो. इंटरनेटवर बोलता येतेच परंतु प्रत्यक्ष पाहताही येते. अशा फितीतरी गोष्टीमुळे विज्ञानाने माणसाचे आयुष्य सुखकर-सोयीस्कर बनवले. अर्थात, विज्ञानाचा शोध मानवाने स्वतःच्या सुखासाठी लावला हे जरी खरे असले तरी त्याचा वापर तो कसा करतो यावर विज्ञानाचे यशापयश ठरते. म्हणजे एखाद्या गोष्टीत जसे फायदे असतात तसे त्याचे तोटेही सहन करावे लागतात. आज अणू परमाणु स्फोटक बॉम्ब आणि तत्सम आयुधांनी राष्ट्र दुर्बलांवर क्य बसवित आहेत. सत्ता व राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हेतूने हायड्रोजन बॉम्ब व अन्य अण्वस्त्रांचा यापूर्वी झालेला प मानदार मानवी संहाराला कारणीभूत ठरला. ह्या अणुशक्तीने हिरोशिमा आणि नागासाकीसारखी शहरे संपूर्ण बेचिराख केली. आज शहरात पूर ओकणान्या नळकांड्यांनी प्रदूषण वाढविले. माणसाच्या जीवनातील मूल्ये नष्ट झाली आहेत. त्याचे जीवन अर्थशून्य बनू लागले आहे. गा विज्ञानाच्या घोडदौडी माणूस नैसर्गिक संतुलन हरवून बसला आहे. त्याचे शारीरीक कष्ट कमी झाले आणि तो मंत्राचा गुलाम बनला आणि यंत्रे ही मानवासाठी आहेत हे माणूस विसरला माणसापेक्षा यंत्रा प्राधान्य आले की, जणू काही यंत्रांसाठी मानव आहे. थाना अंतर्गत वरील सर्व गोष्टीवरून आपल्या असे लक्षात येते को विज्ञानाची प्रगती, विज्ञानाचे चमत्कार है जिसके मुखद आहेत, जेवढे फायदे विज्ञानाचे आहेत तितकेच तोटेही आहेत. कारण या विज्ञानानेमाणसाच्या विनाशक सामर्थ्यात केलेली वाढ भयावह आहे. एका अणुबॉम्बने हजारो निरपराधी लोकांचे जीवन उद्धवस्त केले. त्यामुळेच विज्ञानाचा शोध मानवाने आपल्या फायद्यासाठी केला असला तरी त्याचा वापर कसा करायचा याचे भान ठेवले नाही तर विज्ञानाचा उपयोग हा निश्चितच धोक्याचा, तोट्याचा असू शकेल.

Leave a Reply