एका निवृत्त शिपायाचे आत्मवृत्त

नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शेकतो ते मी पाहिल” • दहावी नापास झाल्यामुळे पुढे शिकविण्यासाठी आई-वडील तयार नव्हते. घरची आर्थिक परिस्थिती गरीबीची होती. कुठेतरी नोकरी शोधण्याच्या धडपडीला लागलो. घरी मी मोठा असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती; कारण आई-वडील थकले होते. माझ्या डोक्यामध्ये नवनवे विचार येत होते. काही असो नोकरी शोधायचीच. मग मला वाटले. मिलिटरीमध्येच नोकरी करावी. देश सेवा करण्याची संधीमिळाली तर ती दवडू नये आपल्या देशात अनेक लोकांनी भारतासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यापुढे तर लागला होता आणि मी सैन्यात भरती होण्याचे मनाशी पक्के ठरविले; कारण त्यामुळे नोकरी आणि देशसेवा दोन्ही साधणार होते. अखेर एक दिवस रेडिओवर बातमी आली सैनिकांची भरती होती पुढच्या आठ तारखेला सेनाभरती कार्यालयामध्ये जाताच मुलांच्या मोठ्या रांगेमुळे मी पावरतो, परंतु आत्मविश्वास कायम होता. अखेर सर्वचण्या घेण्यात आल्या आणि माझी सैनिक भरतीमध्ये निवड झाली. पुढच्या आठवड्यात प्रशिक्षणासाठी हजर राहण्यांनी सांगितले घाईतच घरी गेलो, आईवडिलांना . वडील खुश झाले आई मात्र
खुप रडू लागली. शेवटी आईबी ममता आहे ना ? आईला आपला मुलगा प्रिय असतो तिला वाटत असते मुलाने नेहमी आपल्याजवळच राहावे परंतु मी आईला समजाविले काळजी करायची नाही. मो पत्र पाठवतोय हा कुठे आईला धीर आला. रेल्वे स्टेशनवर वडील पोहचवायला आले होते. शेवटी त्यांना ही पुत्रप्रेमाने राहवले नाही बाजूला होत त्यांनी कसेतरी स्वतःला सावरले. सैनिकात भरतीसाठी निवड झाल्यामुळे मी आनंदलो होतोच. सैनिक मुख्यालयात मला पाठविण्यात आले तेथून प्रशिक्षणासाठी दुसरीकडे हलविण्यात आले. प्रशिक्षणात खूप गम होत असे. सकाळपासून दुपारपर्यंत कवायत नंतर जेवण पुन्हा तीन वाजता नकाशावाचन, चूक झाली तर शिक्षा भोगावी लागत असे. खूप परिश्रम घेऊन मी पूर्णपणे प्रशिक्षित झालो. पुढे माझे स्थानांतरण राजस्थानमध्ये करण्यात आले. माझ्यासोबत दोन तीन महाराष्ट्रीय मुले होती. सुटी खूप कमी मिळायची. त्यामुळे कुटुंबाबद्दलची ओढ मनाला फार वाटत होती. ड्यूटी करीत असताना एक दिवस निरोप आला की, भारताचे पाकिस्तानसोबत युद्ध होणार सगळे सतर्क झाले. दुसऱ्या दिवशी युद्धाची तयारी करावी लागली सैनिकांना सांगण्यात आले की संपूर्ण बलाने शत्रूवर मारा करायचा आणि एक दिवस एक रात्र बंदूक तोफांच्या आवाजाने अख्खा परिसर गरजून उठला. अनेक सैनिक बांधव तोफांच्या मान्याला बळी पडले. परंतु भारत मातेच्या संरक्षणाकरिता स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सर्वशक्तीनिशी पाकिस्तानी सैन्याला आम्ही पळवून लावले युद्धात विजय आमचा झाला होता, त्यामुळे आम्ही आनंदात होतो. अशी अनेक वर्षे उलटून गेलो. माझी नोकरी जशी जशी निवृत्तीकडे जात होती. तसतशी मला वेदना होऊ लागली. आयुष्यभर निवृत्त होऊच नये असे वाटू लागले, परंतु नियमच असल्यामुळे मला निवृत्ती घ्यावी लागली; कारण माझ्या निवृत्तीनंतर कुणाची तरी नियुक्ती होणार होती. एखाद्या गरजूला रोजगार मिळणार होता. निवृत्त झाल्यावर मी अजूनही सैनिक वृत्तीतच वावरतो भी लोकांना सांगतो. सैनिक हा कधीच मरत नाही, तो देशाचा अभिमान आहे, हृदय आहे. घरी मला खूप वेळ मिळतो. परंतु एकाच जागेवर बसणे मला आवडत नाही त्यासाठी मी विरंगुळा म्हणून बाहेर फिरतो. बागेत बसतो एखादा सैनिक भेटला तर सैन्यातील युद्धभूमीवरील रोमहर्षक कथा सांगतो, ऐकतो. त्यात मला खूपच समाधान मिळते. पुनर्जन्म मिळाला तर देवाजवळ मी एकच मागणे मागेन. मला सैनिकच बनव जन्मोजन्मी मी सैनिक होऊन देशाची सेवा व राष्ट्र बांधवाचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचे जीवन अर्पण करेन,

Leave a Reply