रस्त्याचे मनोगत

रस्त्याचे मनोगत
ऊन मी म्हणत होतं. माझी सायकल दादा घेऊन गेला होता आणि मला क्लासला जायचे होते जर गेले नाही तर बाबांचा मार नाहीतर क्लासच्या सरांचे बोलणे बसेल म्हणून मी क्लासला पायी चालत निघाले रणरणत्या उन्हात रस्ता नुसता तळपत होता. भर दुपार असल्याने रस्त्यावर रहदारी बरीचशी कमी होती. मी रोज सायकलवर जाते तेव्हा मध्येच खड्डे आले तर मी त्या रस्त्यावर वैतागायची आणि बाजूने सायकल घेऊन जायची. पण मी आता रस्त्याने अगदी आत्मीयतेने पाहत चालले होते. तर काय गंमत झाली, रस्ता चक्क माझ्याशी बोलू लागला, “मुली, तू आज माझ्याकडे एवढी आत्मीयतेने बघते हे पाहून माझे हृदय अगदी गलबलून आले. नाहीतर या धावपळीच्या जीवनात तुम्हाला माझ्याकडे लक्ष द्यायला किंवा माझ्याविषयी विचार करायला वेळ तरी असतो का? तू आता माझा विचार करते आहेस हे पाहून मी तुझ्याशी बोलण्याचे धाडस केले अंग तू जेव्हा खूष असशील. शाळेतही जात नसशील तेव्हा इथे फक्त पायवाट होती. माझ्या अवतीभोवती छोट्या छोट्या झाडांची गर्दी होती. मी रात्रभर त्यांच्या सहवासात राहत असे, परंतु काही कालावधीने लोकसंख्या वाढली आणि माझ्यात विकास व्हावा असे लोकांना वाटले आणि सरकारतर्फे पायवाटेचा चांगला पक्का रस्ता बनवला, नगरपालिकेने रीतसर मार्गाने एका मोठ्या कंपनीकडे माझ्यात विकास करण्याचे काम दिले. पण काय सांगू ? इतके हाल हाल झाले की त्यावेळी अगोदर मला पूर्णपणे खणून बाजूला फेकले. माझा जो मित्रपरिवार होता त्यांना उपटून माझ्याबरोबर बाजूला फेकून दिले. नंतर माझ्यावर खडी टाकली. केवढा मोठा लोखंडी रोलर फिरविला. खडीचा चक्काचूर झाला आणि नंतर पाणी मारले. मी सगळं मुकाट्याने सहन करत होतो कारण मी काहीच करू शकत नाही हे त्यांना माहीत असल्याने त्यांनी माझे हाल करून सोडले आणि माझे पायवाटेचे रूपांतर रस्त्यात झाले.थोड्याशा खरबरीत अवस्थेत मला बरेच दिवस ठेवण्यात आले माझ्यावरून सायकल चालविताना पायी चालतना अनेक लोक मला शिव्या देत होते. मी सगळे ते मुकाटयाने सहन करत होतो. मग काही लोकांनी परत तक्रारी केल्या आणि रस्त्यावर डावरीकरण करण्याच्या सूचना केल्या. मला वाटतं, डांबरीकरण झालेले तुला माहित असेल. मागचे दिवस परत आले. परत मला खणण्यात आले. खडी टाकण्यात आली, रोलर फिरविला आणि मग माझ्या अंगावर काळेकुट्ट आणि उकळते डांबर ओतले. तूच सांग मला किती वेदना झाल्या असतील त्यावेळेस पण मी त्या वेदना सहन केल्या त्या कोणासाठी ? येथील जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठीच ना? परंतु माझ्याविषयी तुमच्यामध्ये मला जराही कृतज्ञता दिसत नाही. तुम्ही सर्वजण मला पायांनी तुडवता त्याबद्दल मी ब्रशसुद्धा काढत नाही. कारण तुम्हाला जाण्यास सुखावह व्हावे एवढ्यासाठीच तर माझा जन्म आहे. माझे पूर्ण आयुष्य मी तुमच्यासाठीच घालवितो. परंतु आता माझी वेदना वेगळीच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कंत्राटदार काम कसेतरी पूर्ण करतात आणि परत माझी अवस्था पूर्वीसारखी होते परत मला नीट करण्याचा कार्यक्रम आखला जातो पण ही वेदना मी किती वेळा सहन करायची जर एकदाच मला नीट बनविले तर दीर्घकाळ मी तुमची सेवा करू शकणार नाही का? तसेच कोणी मंत्री मंत्री येणार असेल तर परत माझ्यावर उकळते डांबर ओतले जाते. कुठे खांब बसवायच असेल. वेगवेगळ्या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन करायची असेल किंवा काही सण, समारंभ, निवडणुका यांसाठी माझी फोडतोड केली जाते आणि कमानी उभारल्या जातात आणि निवडणूका यांसाठी माझी फोडतोड केली जाते आणि कमानी उभारल्या जातात आणि पिवडणूका संपल्या नेते निवडून आले. सण-समारंभ संपला तर माझ्या केलेल्या मोडतोडीकडे कोणी लक्ष देत नाही आणि मला तुमचे टोमणे सहन करावे लागतात, काय घाणेरडा रस्ता आहे बाई तसेच काही बस अशा असतात की त्यांची वर्षानुवर्षे दुरूस्ती केली जात नाही. त्यामुळे अपघात होतात. टुकवाल्यांचे तर चालताना भान नसते आणि मग आम्हाला दोष देतात की, हा रस्ता चांगला नाही इथे अपघात होतात. अग पण तुला नाही वाटत की, असे अपघात झाल्यानंतर आमच्या अंगावर रक्त सांडल्यानंतर आम्हाला दुःख होत नसेल का? बरं जाऊ दे आमच्या दुःखांना आणि वेदनांना अंत नाही. एवढे बोलून हळव्या हृदयाने बोलणारा रस्ता अचानक गप्प बसला आणि माझ्या विचारांची चक्रे फिरू लागली.

Leave a Reply