मी एक अल्प भूधारक शेतकरी

मी एक अल्प भूधारक
शेतकरी लोकहो आज तुम्ही जमला ते तुम्हाला मिळणारा कांदा महाग झाला म्हणूनच ना! पण तुम्हाला माहित आहे का? आमच्याकडून तो किती स्वस्तात घेतला जातो ते आपर देश हा देश, शेतकऱ्यांचा देश म्हणजे शेतीप्रधान देश मानला जातो. स्वातंत्र्यानंतर औद्योगिक क्षेत्रात देशाचा विकास करण्याचे योजनापूर्वक प्रयत्नही झाले खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल हे म. गांधीनी जाणले होते म्हणून त्यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला. त्यामुळे शेतकऱ्याला विकासासाठी काही संधी उपलब्ध करून देण्यात आल्या कसेल त्याची जमिन असा कायदा आला तो यासाठी की, शेतात राबणारा शेतकरी शेताचा खरा मालक व्हावा आम्हाला कर्जमाफीसुध्दा देण्यात आली. सावकारांकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व कामार्फत आम्हाला मदत देण्यात आली या सान्या गोष्टी केल्याचा गाजावाजा भरपूर झाला. परंतु मी एक अल्पभूधारक शेतकरी म्हणून बोलती माझ्याकडे जमीन बोडीशीच आहे. या योजनांचा मला लाभ मिळाला असता तर मी आज असा गरीब राहिलो नसतो मग प्रश्न असा पडतो की सरकारने ग्रामीण विकासासाठी पर्यायाने शेतकऱ्यांच्या विकासासाठीच बऱ्याच योजना राबविल्या मग शेतकरीवर्ग सुधारला का नाही परंतु सरकारने हा विचार कधी केलेला दिसत नाही की आपण ज्या योजना राबवल्या त्या शेतकन्यांपर्यंत पोहोचल्या की नाही त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला की नाही आजही भारतात शेतकऱ्यांचे दोन वर्ग दिसतात जो सधन शेतकरी आहे ज्यांच्याकडे पहिलेच आहे त्यालाच या सुविधांचा लाभ मिळाला. त्याने आपलाच फायदा करून घेतला त्यामुळे विशिष्ट वर्ग सोडला. तर अजूनही शेतकऱ्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे. ग्रामीण जीवनातील इतर व्यावसायिकांचीही आज आमच्यासारखीच अवस्था आहे. त्यांचे धंदे चालत नाहीत. त्यामुळे तोही आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहिलेला आहे काही वर्षापासून आमचे रसकार राज्यात हरितक्रांती झाल्याची घोषणा करीत आहे. पण ही हरितक्रांतो कोणासाठी झाली? तिच्यातून मिळालेले उत्पन्न कोणाकडे गेले? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ग्रामीण भागात जो एक नया सधन शेतकरी उदयाला आला. त्याच्याकडेच सरकारने राबवलेल्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा होच लोक घेतात. त्या गोष्टींचा कोनोसा आम्हाला लागून ही देत नाहीत. या लोकांमुळेच आज सधन शेतकरीवर्ग अधिक श्रीमंत झाला आहे आणि गरीब शेतकरी गरीबच राहिला आहे. आमच्याकडे शेती कमी असल्याने उत्पन्न कमी झाले आणि ते वर्षभर पुरले नाहीतर आम्हांला सावकारांकडून म्हणजेच धनिक शेतकऱ्यांकडून कर्ज घ्यावे लागतात आणि ते कर्ज फेडता फेडता आमचे आयुष्य संपते आणि शेवटी शेती गहाण ठेवण्याची पाळी येते आणि मग या धार्मिक शेतकऱ्याचे आम्ही एकप्रकारे गुलामच बनतो. त्यामुळे मला असे वाटते की, या गरीब अल्प भूधारक शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. आपण ज्यांच्यासाठी करतो त्यांना त्याचा फायदा मिळतो की नाही याची पाहणी करायला पाहिजे तरच आमच्यासारख्या अल्प भूधारक शेतकऱ्यांचे कल्याण होऊ शकेल. नाहीतर सरकारने कितीही योजनाराबतिल्या तर त्याचा आमच्यासारख्या गरिबांना अशिक्षितांना काहीच फायदा होणार नाही एवढीच आमची अपेक्षा मला तर, साने गुरुजी यांचे ‘आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी .’ हे सारखं डोक्यात घोळत राहतं. खरच असं झालं शेतकऱ्यांचा विकास होईल विशेषतः आमच्यासारखे अल्प भूधारक शेतकरी सुधारतील आणि देशाचा विकासही होईल…

Leave a Reply