दहावी मराठी, जय जय भारत देशा

जय जय भारत देशा
कवितेचा भावार्थ
भारत देश हा जगाला प्रकाशाचे किरण दाखवणारा देश आहे, आणि या देशाचा जय जय कार करताना कवी म्हणतात ही भारतभूमी म्हणजे तपस्वींची भूमी आहे जी उपनिषदांच्या वाणीने उजळुन निघाली आहे. या देशाच्या माती मधूनी अनेक शूरवीर, क्रांतीकारक समाजसुधारक जन्माला आले म्हणून भारत देश हा नररत्नांची खान आहे भारत देश नवीन युगाचे धैर्य बांधणारा देश आहे. प्रकाशाच्या नवीन वाटा निर्माण करणारा देश आहे. भारत देशावर अनेकांनी राज्य केले पण त्यांच्या शक्तीपुढे व छळापुढे भारतीयांच्या माना वाकल्या नाहीत. अन्यायाला सुद्धा भिती वाटेल असे इथल्या शुरवीरांचे कार्य आहे याचा अभिमान सगळ्या भारतीयाना आहे. भारतदेश हा आत्मशक्तिचा देश आहे येथे त्याग आणि भक्तिचा संगम पाहायला मिळतो. भारत देश हा जगाला प्रकाशाचे किरण दाखवणारा देश आहे म्हणुन त्याचा जय जय कार करुया भारत देश हा कृषीप्रधान देश आहे येथे शेतकऱ्यांच्या श्रमांतुन शेत पिकतात घामाच्या थेंबातून शेतकऱ्याच्या हृदयातील आनंद येथेसांडताना दिसतो भारत देश हा हरितक्रांतीच्या देश आहे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारा देश आहे. भारत देश हा जगाला प्रकाशाची वाट दाखवणारा देश आहे म्हणुन त्याचा जय जय कार करुया भारत देश हा श्रीमंताचा देश नसून गरीबांचा देश आहे; पण तरीही संकटसमयी येथे एकात्मता पाहायला मिळते. हा लोकशक्तिचा आणि दलितमुक्तिचा देश आहे जगाला प्रकाशाची वाट दाखवणारा देश म्हणून त्याचा जयजयकार करूया.

Leave a Reply