एका क्रांतिकारकाचे मनोगत

एका क्रांतिकारकाचे मनोगत
“माझ्या प्रिय देशबांधवांनो तुम्ही आज ‘हुतात्मा दिन’ पाळला तो कशासाठी? एक औपचारिकता म्हणून ? त्यापेक्षा तुम्ही दोन मिनिटं आमच्या आत्म्याला • शांती मिळावी म्हणून स्तब्ध राहता परंतु तुमच्या मनात अनेक विचार घोळत असतात. कोण कोण कशा कशाचा विचार करत असतात हे माझ्याच तोंडून सांगणे मी यथायोग्य समजत नाही. काहींना तर दोन मिनिट उभे राहणे म्हणजे फासावर लटकविल्यासारखे होते. अहो, तुम्ही एवढे निष्ठुर कसे झालात? आपली मातृभूमी तर प्रत्येकाला प्रिय असते. मग त्या भूमीचा, आपल्या राष्ट्राचा सार्थ अभिमान सगळ्यांनाच नको का?” आपल्या सर्वस्वाची आहुती दिली त्यांचे साधे स्मरणही तुम्हांला असू नये अरे आमच्यातील काहींनी तर आपल्या मायभूमीसाठी कौटुंबिक सुखाची यज्ञकुंडात आहुती टाकली आणि त्या यज्ञकुंडात ते स्वतः कुटुंबीय सर्वार्थाने होरपळले गेले तरी त्याचे दुःख झाले नाही कारण आम्हाला एकच ध्यास होता तो स्वातंत्र्याचा खरोखरच मला माझ्या देशबांधवांची दया येते आणि कीवही करावीशी वाटते ‘माणूस’ हा इतका स्वार्थी बनेल असे आम्हाला वाटलेसुद्धा नव्हते. त्यावेळेस म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आम्ही सर्वजण भारावलो होतो ते एकाच विचाराने, एकाच ध्यासाने ते म्हणजे ‘स्वातंत्र्य जोपर्यंत स्वातंत्र्याची होळी आपल्या देशात पेटत नाही आणि स्वातंत्र्याची पोळी भारतवासीयांना खायला मिळत नाही तोपर्यंत आमच्या मनाला शांती नव्हती. सावरकराप्रमाणेच आम्ही सगळ्यांनीच एकच मंत्र पाठ केला होता तो म्हणजे, तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण, तुज सकळ बराचर शरण मानसिक, शारीरिक, राजकीय, आर्थिक गुलामगिरी हे एक प्रकारचे पारतंत्र्याचे जीवन होते म्हणून पारतंत्र्यात जीवन जगणे म्हणजे आमच्या दृष्टीने एक प्रकारचा मृत्यूच होता. त्यासाठी भारतमातेची गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी आम्ही आमच्या सर्वस्वाचा त्याग केला होता. आपली भारतमाता एखाद्या गरीब गायीसारखी ब्रिटिशरूपी कर वाघाच्यासमोर दयनीय स्थितीत उभी पाहून आमच्यात एक प्रकारचा त्वेष निर्माण झाला होता. एकच तारा समोर आणि पायतळी अगार अशी सर्वांची अवस्था निर्माण झाली होती आम्ही जे सतीचे वाण स्वीकारले होते ते जानूनबुजून स्वीकारले होते आम्हाला आमच्या जीवनाचा शेवट माहीत होता तरी आम्ही त्या संकटांना धैर्याने सामोरे जात होतो. आम्हाला हे सतीचे वाण देशभक्तीचे व्रत दिले ते टिळकांनी. कारण त्यांनी केवढ्या आशेने म्हटले होते की, स्वराज्या माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, त्यांच्या या आशेचा किरण आम्हाला वास्तवात आणायचा होता. गांधीजींनी आम्हाला सत्य-अहिंसेचा मार्ग दाखविला. त्यामुळे ब्रिटिशरूपी वाघाने आम्हाला कितीही त्यांच्या पंजाने पकडून ठेवले तरी आम्ही ध्येयापासून थोडेसुद्धा विचलीत झालो नाही. आम्ही आमच्या शरीराचा सुखाने संहार करण्यास तयार झालो होतो. माझ्या प्रिय बंधुनो, आपण जे स्वातंत्र्य मिळविले ते एकीच्या •बळावर मिळविले. जर सावरकरांना आमच्यासारखे मित्र मिळाले नसते, त्यांच्या कुटुंबासारखी मातृभूमीसाठी त्याग करणारी माणसे भेटली नसती, तर त्यांनाही ब्रिटिशांना सामोरे जाणे अशक्य झाले असते. आम्ही कुठलाच भेद ठेवला नव्हता. स्वार्थ हा तर आम्हाला शिवलाही नव्हता. म्हणजेच आमच्यातील निःस्वार्थीपणामुळे एकीमुळे आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो. कठोर शिक्षा हसतमुखाने स्वीकारल्या आणि भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त केले. भारताला स्वातंत्र्य मिळाले आता या स्वराज्याचे सुराज्य लवकर निर्माण होईल, अशी अशा बाळगून होतो पण तो आनंदाचा क्षण अजूनही आमच्या वाट्याला येऊ शकत नाही ही किती खेदाची बाब असेल बरे तुम्ही आता स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सवही वाजत-गाजत साजरा केला पण स्वराज्याचे सुराज्य निर्माण करण्यासाठी तुम्ही काय केले ? प्रत्येकजण ‘स्व’चा विचार करताना दिसतो. खरच जर तुम्ही देशातील अज्ञान, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार बेकारी नाहीशी करण्याचा प्रयत्न केला तर लवकर स्वराज्याचे सुराज्य तुम्ही बनवू शकाल आणि जोपर्यंत सुराज्य बनत नाही तोपर्यंत आमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा.”

Leave a Reply